सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रूपा गांगुलीनं अनेक सवाल उपस्थित करत केली CBI चौकशीची मागणी !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या बद्दल सुरू असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे CBI चौकशीची मागणी करत आहेत. यात आता आणखी एक नाव अॅड झालं आहे ते नाव म्हणजे महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपा गांगुली आहे. रूपानं एक ट्विट केले आहेत ज्यात तिनं केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

रूपा गांगुलीनं ट्विटरवर एकामागे एक असे अनेक ट्विट केले आहेत. #cbiforsushant असं लिहित रूपानं सुशांतच्या आत्महत्येबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रूपानं लिहिलं की, “डिप्रेशनचा मुद्दा सांगणं, सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या मुख्य समस्येपासून ध्यान भटकण्याचा प्रयत्न आहे. आपण खरं तर यावर लक्ष द्यायला नाही पाहिजे. किंवा आपण याकडे संशयित आत्महत्या म्हणून पाहायला हवं का ?”

आणखी एका ट्विटध्ये रूपा म्हणते, “जर कोणती सुसाईड नोट मिळालीच नाहीये तर पोलीस या घटनेला आत्महत्या म्हणून कसं घोषित करू शकतात ? सीसीटीव्ही फुटेजचा तपास झाला आहे का? कोणी घरात आलं नव्हतं याची खात्री झाली आहे का ? त्याच्या शरीरात काही विषारी पदार्थ असल्याचं पोस्टमार्टममध्ये आढळलं होतं का ? हा तपास घाईत झाला आहे का ? फॉरेंसिक टीम 15 जूनला का पोहोचली ?” असे अनेक सवाल तिने केले आहेत. प्रत्येक ट्विटला तिनं एक इमेज वापरली आहे ज्यावर मोठ्या अक्षरात #cbiforsushant असं लिहिलंय. इतरही अनेक ट्विट्स तिनं केले आहेत आणि बरंच काही ती बोलली आहे. सध्या तिचे ट्विट्स चर्चेत आहेत.