‘कोरोना’ व्हायरस ‘बागी 3’ वर ‘बेअसर’ ! ‘एवढ्या’ कोटींची कमाई करत बनवलं ‘हे’ रेकॉर्ड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अहमद खान दिग्दर्शित आणि टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर स्टारर बागी 3 हा सिनेमा शुक्रवार दि 6 मार्च 2020 रोजी थिएटरमध्ये रिलीज आहे. अ‍ॅक्शननं भरपूर या सिनेमात टायगर आणि श्रद्धा यांच्याव्यतिरीक्त रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. देशभर कोरोनाची दहशत परसत असतानाही याचा सिनेमाच्या कमाईवर परिणाम झाला नाही असं दिसतंय. रिलीजच्या पहिल्याच दिशी सिनेमानं सर्वाधिक कमाईचं रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. आधी हे रेकॉर्ड अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमाच्या नावावर होतं. परंतु बागी 3नं आता तान्हाजीला मागे टाकलं आहे. बागी 3 हा सिनेमा 2020 मध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

बागी 3 शुक्रवारी रिलीज झाला. शनिवारी आणि रविवारी सिनेमानं बम्पर कमाई केली आहे. आतापर्यंतचं सिनेमाचं कलेक्शन 50 कोटींच्या पुढे गेलं आहे. असंही म्हटलं जात आहे की, होळीचा सिनेमाला चांगला फायदा मिळत आहे. या आठवड्यातही सिनेमा शानदार कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्या दिवशी बागी 3 नं 17 कोटी कमावले होते. यावर्षी रिलीजच्या दिवशी एवढी कमाई करण्याचं हे एक रेकॉर्ड आहे. दुसऱ्या नंबरवर आता तान्हाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमा आहे. या सिनेमानं पहिल्या दिवशी 15 कोटी कमावले होते. तिसऱ्या क्रमांकावर लव आज कल 2आहे. ज्यानं पहिल्या दिवशी 12 कोटी कमावले होते. पहिल्या दिवशी 10 कोटींची कमाई करणारा स्ट्रीट डान्सर थ्री डी चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या दिवशी 9 कोटी कमावणारा शुभ मंगल ज्यादा सावधान हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर आहे.

बागी 3 नं पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 17.50 कोटी कमावले. बागी 3 दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 16.03 कोटींची कमाई केली तर रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी 20.30 कोटी कमावले आहेत. अशा प्रकारे बागी 3 सिनेमाची 3 दिवसांची एकूण कमाई 53.83 कोटी झाली आहे.