‘अमिताभ-आयुष्मान’चा ‘गुलाबो सिताबो’ अडचणीत सापडला ! ‘या’ व्यक्तीची पोलिसात तक्रार, केले ‘हे’ आरोप

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर गुलाबो सिताबो हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. परंतु त्याआधीच सिनेमाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सिनेमावर स्टोरी चोरल्याचा आरोप होत आहे. दिवंगत लेखक राजीव अग्रवाल यांचा मुलगा अकीरा अग्रवाल यांनी ट्रेलर पाहिल्यानंतर मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत रायटर जुही चतुर्वेदी आणि मेकर्सविरोधात कॉपीराईटचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप
अकीरा अग्रवाल यांनी म्हटलं की, या सिनेमाची स्टोरी त्यांचे दिवंगत वडिल राजीव अग्रवाल यांच्याकडून लिहलेल्या स्क्रिप्टवरून चोरण्यात आली आहे. 16 मोहनदान लेन असं त्यांच्या या स्क्रिप्टचं नाव आहे. याच स्क्रिप्टला पूर्णपणे त्यात उतरवलं आहे. दोन्हीमध्ये बरंच साम्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 16 मोहनदास लेनमधील स्टोरी उत्तर भारताच्या दिल्लीजवळील एक गाव रामपुरावर आधारीत आहे. गुलाबो सिताबो मध्ये देखील जामा मस्जिदचा काही भाग दाखवण्यात आला आहे.

पाठवली लीगल नोटीस
रिपोर्टनुसार, वकिल रिजवान सिद्दीकी यांनी दावा केला की, जुही चतुर्वेदीनं त्यांच्या क्लाएंटची स्क्रिप्ट चोरली आहे. अकीरा यांनी स्क्रिप्ट दाखवण्याची मागणी करत लीगल नोटीस पाठवली आहे. ही नोटीस डायरेक्टर शुजित सरकार, प्रोड्युसर अरिजीत ध्रुव लहरी आणि रायटर जुही चतुर्वेदीला पाठवण्यात आली आहे. स्क्रिप्ट चोरल्याचा मुद्दा यात उचलून धरला आहे.

काय म्हणाले निर्माते ?
निर्मात्यांनी एक स्टेटमेंट जारी करत म्हटलं की, जुहीवरील चोरीचे आरोप निराधार आहेत. फक्त ट्रेलर पाहून कोणी स्टोरीचा अंदाज कसा लावू शकतं. 16 मोहनदास लेनमध्ये प्रमुख पात्र हवेलीच्या देखरेखीसाठी पैसे नसल्यानं ती हवेली विकत आहे. परंतु सिनेमाच्या ट्रेलरवरून दिसत आहे की, अमिताभ हवेलीच देखभाल करू शकत नाहीत परंतु ते हवेली विकत नाहीत.