Nora Fatehi Birthday : कधी ‘वेटर’ तर ‘अडीनडी’ला लॉटरी विकण्याचं काम केलं, Bigg Boss नंतर बदललं नोरा फतेहीचं ‘आयुष्य’

मुबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री नोरा फतेही आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करीत आहे. दिलबर-दिलबर आणि साकी यासारख्या गाण्यांच्या रीमेकमध्ये दिसलेल्या नोराने आज बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण केले आहे. हार्डी संधू यांच्या ‘क्या बात है’ म्युझिक अल्बममधून तिला चांगलीच ओळख मिळाली होती. त्यानंतर तिने आपल्या डान्सचा जलवा दाखवून चाहत्यांच्या मनात घर केले. लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नोराबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. तिने एकेकाळी वेटरचे काम व लॉटरी विकण्याचे काम देखील केले आहे. चला तर मग जाणून घेऊया नोरा फतेहीच्या जीवनाशी संबंधित काही खास आणि मनोरंजक गोष्टीं…

अभिनेत्री नोरा फतेहीच्या बॉलिवूड जर्नीबद्दल बोलायचे म्हणले तर नोराला येथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तिच्या स्ट्रगलिंग डेजमध्ये ती एका खोलीत पीजी म्हणून राहत होती जिथे तिने 8 मुलींसह खोली शेअर केली होती. हिंदी भाषा न येण्यामुळे तिना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. तिला बर्‍याचदा अश्लील कमेंटही केल्या जात होत्या.

स्वत: नोराने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिला स्ट्रगल डेजमध्ये एका कास्टिंग एजंटचा सामना करावा लागला होता, ज्याने तिचा केवळ अपमान केला नाही तर तिच्या चेहर्‍यावर आणि शरीरावर अश्लील भाष्यही केले आणि तिची चेष्टादेखील केली होती.

नोराच्या म्हणाली की, ‘जेव्हा ती ऑडिशनला जायची तेव्हा हिंदी न आल्यामुळे ती वेळ तिच्यासाठी सर्वात कठीण असायची. लोक तिची चेष्ठा करायचे हे देखील तिला कळत नव्हते. नोरा म्हणाली की, त्या काळी ती मेटंली तयार नव्हती, त्यामुळे लोक तिला वेड्यात काढत असत. तिला खूप वाईट वाटायचे अनेकदा ऑडिशन देऊन घरी परत येताना ती बर्‍याच वेळा रडली देखील आहे.

नोरा एक रुढीवादी अरब कुटुंबातील आहे, ज्यामुळे तिला केवळ प्रोफेशनलच नाही तर कौटुंबिक जीवनातही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. नोरा म्हणाली की, ज्या डान्समुळे तिला ओळखले जाते त्या डान्सची प्रॅक्टिस ती घरात एका खोलीत करत होती जेणेकरुन कोणालाही कळू नये की ती डान्स करते. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर नोरा अलीकडेच ‘स्ट्रीट डान्सर 3’ डी मध्ये दिसली होती, यात तिच्यासोबत श्रद्धा कपूर आणि वरुण धवन देखील होती.