पत्नी अभिनेता ह्रितिक रोशनची होती मोठी ‘फॅन’, पतीनं चाकूनं सपासप भोसकून केला खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या पत्नीला ह्रितिक रोशन खूपच जास्त आवडतो या जलसीच्या भावनेतून एका पतीने पत्नीची हत्या केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पतीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. अमेरिकेतील ही धक्कादायक घटना आहे.

दिनेश्‍वर बुद्धिदत नावाच्या व्यक्तीने आपल्या 27 वर्षीय डॉन दोजॉय नावाच्या पत्नीची चाकूने हत्या केली. डॉन एक बार टेंडर म्हणून काम करत होती. या व्यक्तीच्या मित्रांकडून ही माहिती मिळाली की दिनेश्वर आपल्या पत्नीवर या कारणामुळे खूप जास्त चिडत होता की त्याची पत्नी बॉलिवूड ऍक्टर ह्रितिक रोशनची खूप मोठी चाहती होती आणि यामुळेच दिनेश्वरला खूप राग येत होता.

मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा पत्नी ह्रितिक रोशनचे एखादे गाणे पहात असेल तर दिनेश्वर तिला गाणे बंद करायला सांगत असे कारण तो या कारणामुळे खूप चिडत असे. पोलिसांनी सांगितले की, पत्नी हे घर सोडून जाणार होती परंतु फिल्म पाहण्याच्या बहाण्याने ती थांबली आणि त्याच संध्याकाळी दिनेश्वरने पत्नीच्या बहिणीला मेसेज केला की त्याने पत्नीची हत्या केली आहे आणि घराची चावी बाहेर ठेवलेल्या फ्लॉवर पॉट खाली ठेवलेली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like