‘सलमान-अक्षय’च्या लढाईत टायगर श्रॉफचे ‘हाल’, ‘एवढं’ मोठं नुकसान होणार

पोलीसनामा ऑनलाइन  : बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफचा बागी 3 सिनेमा अलीकडेच रिलीज झाला. आतापर्यंत या सिनेमानं 83 कोटींहून अधिक कमाई केली आहे. बागी 2 सिनेमाच्या तुलनेत या सिनेमाच्या कमाईचा स्पीड कमी असल्याचं सांगितलं जात आहे. सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही लोकांना सिनेमा आवडला आहे. क्रिटीक्ससोबतच असेही काही लोक आहेत ज्यांना सिनेमात खास आवडला नाही. या सिनेमाच्या कमाईच्या कमी गतीच्या मागे आणखी एक कारण आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली आणि युपीमधील अनेक थिएटरमध्ये बागी 3 सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. असा दावा केला जात आहे की, बागी 3 च्या प्रॉडक्शन हाऊसनं सिनेमाच्या रिलीजवर थिएटरच्या मालकांना अट घातली होती. ही अट अशी होती की, बागी 3 सिनेमा जर थिएटरमध्ये चालवायचा असेल तर अक्षयचा ईदच्या दिवशी येणारा सिनेमा लक्ष्मी बॉम्बसाठी आधीपासून 4 शो रिझर्व करावे लागतील.

असं सांगितलं जात आहे की, ईदच्या दिवशीच अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्बसोबत आणि सलमान खानचा राधे रिलीज होणार आहे. दोन्ही सिनेमांची टक्कर होणार आहे. हेच कारण आहे की, प्रॉडक्शन हाऊसनं ही अट घातली होती. राधे सिनेमाच्या जास्त कमाईच्या भीतीनं लक्ष्मी बॉम्बच्या प्रॉडक्शन हाऊसला शो रिझर्व करायचे होते. परंतु थिएटर मालकांनी ही अट मान्य केली नाही.

याचे कारण असे आही की, चाहत्यांनासोबत थिएटरच्या मालकांना विश्वास आहे की, लक्ष्मी बॉम्बमुळं जरी राधे सिनेमाची कमाई कमी होणार असली तरीही त्याची एकूण कमाई मात्र लक्ष्मी बॉम्बपेक्षा जास्तच असणार आहे. तर दुसरीकडे अक्षयच्या चाहत्यांनाही त्याचा सिनेमा लक्ष्मी बॉम्बवर भरोसा आहे.

परंतु सलमान आणि अक्षयच्या चाहत्यांमधील या लढाईत आणि यामुळं प्रॉडक्शन हाऊस आणि थिएटरच्या मालकांमधील अट या सगळ्या खेळात उलट बागी 3 सिनेमालाच कमी स्क्रीन मिळाल्या. दोघांच्या सिनेमाच्या 3 महिने अगोदर सिनेमा रिलीज होऊनही बिचाऱ्या टायगरचंच नुकसान झालं.