211 गायकांनी मिळून ‘जयतु भारतम्’ गायलं, लता मंगेशकरांनी केलं ट्विट, PM मोदींनी केली ‘प्रशंसा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसशी संपूर्ण देश लढा देत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू केला आहे. यामुळे लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या संकटाच्या काळात देशाची शक्ती वाढविण्यासाठी प्रसिद्ध गायकांनी एक गाणे तयार केले आहे, ज्याचे शिर्षक आहे जयतु जयतु भारतम. हे गित 211 गायकांनी मिळून गायले आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी याबाबत ट्विट केले, ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट करत गाण्याचे कौतूक केले आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विट करून लिहिले की, नमस्कार.. आमच्या आयएसआरएच्या गुणवंत 211 कलाकारांनी एकत्रित येऊन आत्मनिर्भर भारताच्या भावनेने प्रेरित होऊन हे गीत निर्माण केले आहे, जे संपूर्ण भारतातील जनतेला आणि आपल्या आदरणीय पंतप्रधानांना अर्पण करत आहोत. जयतु भारतम.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाण्याचे कौतूक करताना रिट्वीट करत म्हटले की, हे गीत प्रत्येकाला उत्साहित करणारे आणि प्रेरणादायी आहे. यामध्ये आत्मनिर्भर भारतासाठी सुरांनी सजलेले आवाहन आहे. आशा भोसले यांच्यासह सुमारे 211 गायक जयतु जयतु भारतम, वसुधव कुटुम्बकम या नव्या गीतासाठी एकत्रित आले आहेत. हे गाणे प्रत्येक भारतीयासाठी सलामीप्रमाणे आहे, जे कठीण काळात एखाद्या परिवाराप्रमाणे एकजुट होऊन सोबत आहे. हे गीत 14 विविध भाषांमध्ये आहे.