Coronavirus Impact : ‘बेबो’ करीनाचा IPL 2020 ची जाहिरात शुट करण्यास ‘नकार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता सरकारनं थिएटर, जीम, शाळा, कॉलेज बंद केलं आहे. टीव्ही अ‍ॅड्स, आयपीएल मॅच, शुटींगही रद्द केल्या जाताना दिसत आहेत. फिल्म इंडस्ट्री पूर्णपणे बंद केली आहे. अनेक स्टार्स असे आहेत ज्यांनी सिनेमा आणि जाहिरातीत काम करण्यासाठी करारही केला होता. परंतु कोरोनाची दहशत पाहता बॉलिवूड स्टार्स शुटींगमध्ये भाग घेण्यास नकार देत आहेत.

करीना कपूर देखील आयपीएलच्या मॅचदरम्यान सुरू असणारी अ‍ॅड फिल्म शुट करणार होताी. परंतु कोरोनाच्या भीतीनं करीनानं अ‍ॅड फिल्मच्या शुटींगला जाण्यासाठी नकार दिला. त्यामुळं आता या अ‍ॅड फिल्मच्या शुटींगसाठी तयार करण्यात आलेला सेटही डिस्मेंटल करण्यात आला आहे. अ‍ॅड फिल्म मेकर्सही शुटींग करणं टाळत आहेत. कारण अशा काळात शुट केल्यानं त्यांचंही बजेट वाढत आहे. बजेट वाढण्याचं कारण म्हणजे सेटवर कोरोनापासून वाचण्यासाठी घ्यावी लागणारी खबरदारी आहे.

https://www.instagram.com/p/Bgg8HANg0ml/

जास्त करून टीव्ही मालिकांची शुटींग ही फिल्म सिटीत होत असते. 19 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत टीव्ही सेटदेखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

https://www.instagram.com/p/BgY-LXiAwrH/

https://www.instagram.com/p/BgYjplegzdP/

https://www.instagram.com/p/BgYftUegQoD/

https://www.instagram.com/p/B90itjbhfhx/

https://www.instagram.com/p/B9wesSBB6PE/

https://www.instagram.com/p/B9oiV3bhGGg/

https://www.instagram.com/p/B9mFNUOBKiQ/