अन् कियाराचं ‘हिडन’ टॅलेंट सर्वांसमोर आलं !

पोलीसनामा ऑनलाईन : ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून सर्वत्र लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी हीचा चित्रपटसृष्टीतील सुरुवातीचा प्रवास म्हणावा तेवढा यशस्वी ठरला नव्हता. ‘फगली’ या चित्रपटातून कियारा अडवाणीने तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर ‘मशिन’ या चित्रपटात तिला भूमिका मिळली, मात्र या दोन्ही चित्रपटामध्ये तिला लोकप्रियता मिळाली नाही. पण त्यानंतर चर्चेत असलेल्या ‘लस्ट स्टोरी’ या वेब सिरीज मध्ये प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. आणि त्यानंतर ‘कबीर सिंग’ चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे ती सर्वत्र प्रसिद्ध झाली. नुकतेच कियाराने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने कबीर सिंगमधील ‘बेखयाली’ हे गाणं गायल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

यावेळी कियाराने सांगितले कि, ‘यापूर्वी तिने कधीही गाणं गायलं नव्हतं. मी एक बाथरूम सिंगर आहे. सगळ्यांसमोर गाणं सादर करण्याचा हा पहिलाच अनुभव होता.

तिने पुढे सांगितले कि, हे अचानक झालं. मी या अवॉर्ड शोमध्ये कबीर सिंगमधील गाण्यावर परफॉर्म करणार होती. मात्र, मी त्याला जास्त व्यक्तिगत करण्यासाठी विचार केला कि गाणं गाऊयात. आयोजकांनी मला विचारलं की, तू गाणं गाण्याच्या निर्णयावर ठाम आहेस आणि मी म्हणाले की, शॉट देते. आयोजकांनादेखील संधीचा फायदा घेत, लगेच रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये व्यवस्था केली. ‘हे सगळं १५ मिनिटांत ठरलं. नशीब सगळं नीट जुळून आलं आणि आम्ही या चंकचा वापर अॅक्टच्या शेवटी केला, असेदेखील किनारा म्हणाली.

दरम्यान, कियारा आता ‘गुड न्यूज’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत करीना कपूर, अक्षय कुमार व दिलजीत दोसांझ हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कियारा ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘इंदु की जवानी ‘, ‘भूल भुलैया २’ व शेरशाह’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

Visit : policenama.com

You might also like