‘मिर्झापूर’मधील अभिनेत्री अनंगशाचा ‘सवाल’, ‘बोल्ड सीनसाठी पुरुषांना ट्रोल का नाही केलं जात ?’

पोलीसनामा ऑनलाइन – मिर्झापूर या वेब सीरिजमधील अभिनेत्री अनंगशा विश्वास हिनं अलीकडेच एका मुलाखीतत पुरुष प्रधान मानसिकतेवर सवाल उपस्थित केले आहेत. तिनं समाजाला तीन प्रश्न विचारले आहेत.

अनंगशानं पहिला प्रश्न विचारला आहे की, बोल्ड सीनसाठी नेहमी महिलांनाच का ट्रोल केलं जातं. पुरुषही यात सहभागी असतातच ना. त्यांच्यावर कोणीच सवाल उपस्थित करत नाही. दुसरा प्रश्न तिचा असा आहे की, पुरुष अभिनेत्याला यामुळं अपमानाचा सामना का नाही करावा लागत ? तिसऱ्या प्रश्नात ती म्हणते, बोल्ड सीन देणं एवढी मोठी गोष्ट का आहे ?” असं ती म्हणाली आहे.

हे अनेकदा समोर आलं आहे की, अभिनेत्रींना बोल्ड सीन दिल्यानंतर खासगी आयुष्यात टीकेला सामोरं जावं लागतं. आपला आवडता रोल केल्यानंतरही लाजिरवाणं वाटतं. लोक हे विसरतात की, अॅक्ट्रेसं केलेला रोल हा काल्पनिक असतो. भूमिका या समाजाचा आरसा असतात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या लोकांच्या विचारसरणीला आपण बदलू शकत नाही.

https://www.instagram.com/p/BPIWxc5Dm4U/?utm_source=ig_embed

पुढे बोलताना अनंगशा म्हणते, “आपण लवकरच जेंडरला घेऊन प्रगतीशील व्हिज अंगिकारलं पाहिजे. पडद्यावर बोल्ड सीन शुट करणं एखादा वॉर सीन शुट करण्यापेक्षाही जास्त कठिण आणि आव्हानात्मक आहे.

अनंगशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं खोया खोया चांद, लव शव ते चिकन खुराना, बेनी बाबू, यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. यातील काही सिनेमे रोमँटीक सिनेमे आहेत. लवकरच ती मिर्झापूर 2 मध्ये जरीना ची भूमिका साकारणार आहे.