पहिल्या वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त खा. नुसरत जहाँनी शेअर केला ‘रोमँटीक’ व्हिडीओ, सोशलवर होतोय व्हायरल ! ( व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बंगाली अ‍ॅक्ट्रेस आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ यांनी विवाहबद्ध होऊन अलीकडेच (19 जून) एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी 19 जून रोजी नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी तुर्कीच्या बोद्रम येथे लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. या खास निमित्तानं नुसरतनं एक व्हिडीओ शेअर केला होता जो आता सोशलवर व्हायरल होत आहे.

नुसरत जहाँ यांनी त्यांच्या इंस्टावरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. पहिल्या वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त शेअर केलेल्या या फोटोत आणि व्हिडीओत नुसरत आणि पती निखिल यांचा रोमँटीक अंदाज दिसत आहे. खास बात अशी की, त्यांनी फोटोला दिलेलं कॅप्शनही खूप रोमँटीक होतं जो चाहत्यांना खूप आवडलं होतं.

https://www.instagram.com/p/CBlzhE5HKjX/?utm_source=ig_embed

इतकंच नाही तर लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानं पती निखिल जैननं देखील नुसरत यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे आणि पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CBlNYNWH6g5/?utm_source=ig_embed

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बंगाली सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत स्वत:चं एक स्थान तयार केलं आहे. अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या नुसरत यांनी शोत्रु या सिनेमातून फिल्मी दुनियेत पाऊल टाकलं होतं. 2011 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. खोका 420, जमाई 420, खिलाडी, क्रिसक्रॉस, नकाब, लव्ह एक्प्रप्रेस अशा अनेक सिनेमात नुसरत यांनी काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B66j6ZfH1oD/