Coronavirus : स्पेनच्या रुग्णालयात ‘ओम’ मंत्राचा ‘जप’, ‘कोरोना’तून बाहेर पडण्यासाठी ‘प्रार्थना’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळं पूर्ण मानवता धोक्यात आली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक देशातील लोक शक्य तो प्रत्येक प्रयत्न करत आहेत. यातील एक युरोपीय देश स्पेन आहे. या देशात कोरोनाग्रस्तांसाठी संख्या खूप आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशात एका रुग्णालयातून एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशलवर चर्चेत आहे.

व्हिडीओत एका रुग्णालयातील दृश्य दिसत आहे. यात दिसतंय की, सर्व डॉक्टर आणि स्टाफ उभा आहे. सर्वजण ओम मंत्रसोबतच वाहेगुरूचा जप करत आहेत. व्हिडीओ शेअर करताना असं सांगितलं गेलं आहे की, हा व्हिडीओ स्पेनच्या रुग्णालयातील आहे. स्पेनमधील लोकांना असा विश्वास आहे की, प्रार्थना केल्यानं कोरोनाग्रस्तांना यातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हिंदू धर्म ग्रंथात ओम मंत्राच्या जपाचे असामान्य फायदे सांगण्यात आले आहेत. असेही अनेक दावे करण्यात आले आहेत की, यामुळं अनेक व्याधी दूर होतात. यामुळं अनेक कामं सोपी होतात. यामुळंच अनेक मंत्रांची सुरुवात ओमनं होते. शीख धर्मातही सतनाम वाहेगुरू प्रार्थनेला सर्वतोपरी दर्जा देण्यात आला आहे.