परिणीति चोप्राच्या मानेला ‘दुखापत’, म्हणाली – ‘सायना नेहवालची भुमिका करणं सोप नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र, यावेळी मानेला दुखापत झाल्याने तिला शूटिंग थांबवावी लागली आहे. डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. परिणीतीने सोशल मीडियावर ही माहिती शेअर करताना लिहिले आहे की, ‘मला दुखापत होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी आणि सायनाच्या टीमने पूर्ण काळजी घेतली होती, पण मी जखमी झालेच.’

परिणीती म्हणाली, ‘मी पूर्णपणे आराम करत आहे. तसेच मी पुन्हा एकदा बॅडमिंटन खेळण्याची तयारी करत आहे.’

परिणीतीने तिचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत परिणीतीच्या मानेवर पट्टी लावली आहे. परिणीतीची प्रकृती पाहिल्यानंतर तिचा मित्र आणि संगीतकार अमाल मलिक म्हणाले की, ‘काळजी घेण्यास मी तुला अगोदरच सांगितले होते. आता पाच-सहा दिवस आराम कर. मला खात्री आहे की, लवकरच तु पुन्हा बॅडमिंटन खेळण्यास सुरूवात करेल. तु आणि सायनाच्या संपूर्ण टीमने या चित्रपटास संपूर्ण सामर्थ्य दिले आहे. माझा विश्वास आहे की, तु हा चित्रपट इतक्या शानदार पद्धतीने करत आहे की जेणेकरून संपूर्ण पिढी प्रत्येक सीन लक्षात ठेवेल. चित्रपटासाठीचे तुझे परिश्रम, रक्त, घाम आणि अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तु एक शेरणी आहे हे सांगण्याची आता ही वेळ आहे.’

सायना नेहवालची बायोपिक यापूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूर करणार होती. चित्रपटाचा पहिला लूक पोस्टरवर प्रदर्शित झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, तिने चित्रपटाचे काही महत्त्वाचे भागदेखील शूट केले होते, पण नंतर श्रद्धा या चित्रपटातून बाहेर पडली. यानंतर परिणीती चोप्राला कास्ट करण्यात आले. या चित्रपटाचे नाव ‘सायना’ आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते आहेत. भूषण कुमार हे चित्रपटाला प्रोड्यूस करत आहेत. परिणीती चोप्रा व्यतिरिक्त परेश रावल या चित्रपटात सायनाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची भूमिका मानव कौल साकारणार आहे.

 

Visit : Policenama.com