‘बिग बी’ अमिताभनंतर आता रकुल प्रीत बनली अजय देवगणच्या Mayday सिनेमाचा भाग ! परंतु सोशलवर होते प्रचंड ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) पुन्हा एकदा डायरेक्शनमध्ये एन्ट्री करणार आहे. आता अजय मेडे (Mayday) या आगामी सिनेमाचं डायरेक्शन करणार आहे. बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हेही या सिनेमात काम करणार आहेत. आता अशीही माहिती आहे की, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) ही देखील या सिनेमाचा भाग झाली आहे. यानंतर रकुल सोशलवर ट्रेंड करताना दिसत आहे. या सिनेमाचा भाग बनल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मेडे सिनेमात अजय अभिनय तर करतच आहे. सोबतच त्यानं हा सिनेमा डायरेक्ट आणि प्रोड्युस देखील केला आहे. अवघ्या 7 वर्षांनंतर अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांची जोडी मेडे (Mayday) या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

अजय आणि रकुल यांचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी दे दे प्यार दे या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर प्रेरीत असणार आहे.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमधील ड्रग अँगल मध्ये एनसीबीनं रकुल प्रीत हिला चौकशी साठी बोलवलं होतं. अद्याप तिला क्लीन चीट मिळालेली नाही तरीही या सिनेमात काम करत आहे. असं असतानाही तिला सिनेमा कसा मिळतो असं म्हणत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

You might also like