Video : दीपिकाला भेटायला गेला रणवीर सिंग ! फॅशन सेंसमुळं पुन्हा एकदा चर्चेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवू़डचा एनर्जेटीक अ‍ॅक्टर रवणीस सिंग (Ranveer Singh) नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या फॅशनमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो चित्र विचित्र कपड्यांमध्ये दिसत असतो. पुन्हा त्याचे काही फोटो समोर आले आहे ज्यात त्यानं वेगळी स्टाईल केली आहे. सध्या त्याचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

रणवीरची पत्नी अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांच्या सोबत सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मंगळवारी (दि 1 डिसेंबर) सकाळी ती शुटींगसाठी अलिबागला निघाली होती. परंतु त्याआधी रणवीर तिला भेटायला आला.

रणवीर दीपिकाला भेटण्यासाठी साऊथ मुंबईमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी त्याचा जो लुक आणि फॅशन सेंस दिसला त्यामुळं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं ब्लॅक अँड रेड प्रिंटेड ट्रॅक सूट घातला होता जो खूप वेगळा दिसत होता. दीपिकानं व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लॅक लोअर घातली होती. दीपिकाला सोडताना त्यानं किसही केलं.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 83 या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. सिनेमात रणवीरनं लिजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊनमुळं सिनेमाची रिलीज टाळण्यात आली.