Sara Ali Khan चं नाव ड्रग्स केसमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच आलं सैफ अली खानचं वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलीवुड अ‍ॅक्टर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या चित्रपटांपेक्षा जास्त ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच साराचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते, ज्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने तिची चौकशी केली होती. मात्र, एनसीबीला तिच्याविरूद्ध काहीही मिळाले नाही, आणि साराला परत घरी पाठवण्यात आले.

या दरम्यान, वृत्त होते की, सैफ अली ख़ान सारा पासून दूर राहात आहे. इतकेच नाही तर, सैफने या प्रकरणात अमृताशी सुद्धा चर्चा केली आणि खुप नाराजी व्यक्ती केली. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा नव्हता. परंतु, अनेक शक्यतांच्या दरम्यान आता सैफ अलीने एक वक्तव्य केले आहे. आपल्या वक्तव्यात सैफने म्हटले की, तो आपल्या तिनही मुलांवर खुप प्रेम करतो, तो भलेही तैमूरसोबत जास्त राहात असेल, परंतु सारा आणि इब्राहिमशी सतत संपर्कात असतो आणि त्यांच्यावर खुप करतो.

बॉलीवुड हंगामा सोबतच्या चर्चेत सैफने म्हटले, मी नेहमी त्यांच्यासाठी (सारा आणि इब्राहिम) हजर राहातो. मला माझ्या तिनही मुलांवर खुप प्रेम आहे. होय, हे खरं आहे की तैमूरसोबत मी जास्त वेळ घालवतो, परंतु मी इब्राहिम आणि साराशी सुद्धा नेहमी संपर्कात असतो. माझ्या हृदयात माझ्या तिनही मुलांसाठी वेगवेगळी जागा आहे. जर मी सारामुळे एखाद्या गोष्टीवरून अस्वस्थ असेन, तर तैमूर मला खुश करू शकत नाही. जेव्हा तुमची मुले होतात, तेव्हा तुमचे हृदय विभागले जाते, आणि तिघांचे वयसुद्धा खुप वेगवेगळे आहे. मी सारा आणि इब्राहिमसोबत बसून तासानतास बोलू शकतो, डिनर करू शकतो, जे मी तैमूरसोबत करू शकत नाही. मला वाटते की, माझ्या दोन्ही मुलांना एका वेगळ्या प्रकारच्या कनेक्शनची गरज आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान जेव्हा त्याची टॅलेंट मॅनेजर जया शाहची चौकशी करण्यात आली तेव्हा जयाच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये साराचे नाव होते, ज्यावरून आरोप होता की, ड्रग्जबाबत चर्चा झाली होती.