जिम संपवून परत जात होती सारा अली खान, एकानं अलगदपणे केलं असं काही (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सारा अली खान बर्‍याचदा जिममध्ये जाताना किंवा परत येताना फोटोग्राफरला फोटो काढण्याची संधी देते. बर्‍याचदा जिममधून परत येत असतानाचे तिचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. तिला भेटण्यासाठी चाहते जिमबाहेर देखील उभे असतात. चाहत्यांच्या प्रेमाखातीर ती त्यांच्यासोबत फोटो देखील घेत असते. परंतु एखाद्या व्यक्तीच्या वाईट वागणुकीमुळे तिला भेटण्याची संधी सामान्य लोक गमवू शकतात.

व्हायरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सारा तिच्या जिममधून परत आपल्या कारकडे येत होती तेव्हा फोटोग्राफर तिचे फोटो काढत असताना तिचे चाहते तिच्याजवळ येऊन फोटो क्लिक करत होते. त्याचवेळी एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि हातात हात घेण्याची विनंती केली. साराने हात मिळवला असता त्या व्यक्तीने अचानक तिच्या हाताला किस केले. अचानक असे केल्याने सारा थोडी गडबडली. काही सेकेंद तिला काय करावे कळाले नाही. त्यावेळी साराच्या सिक्यूरिटीने त्या व्यक्तीला दूर केले आणि सारा कारमध्ये बसली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. एका चाहत्याने व्हिडिओवर लिहिले की, ‘सारा खूप साधी आहे. तिच्याशी कोणीही असे वागू नये. आपल्या मर्यादा ओलांडू नका.’ त्याचवेळी साराच्या चाहत्यांनी तिला बॉडीगार्ड ठेवण्याचा सल्ला दिला. एका चाहत्याने सांगितले, ‘सारा अगदी सामान्य माणसासारखीच जगते. पण अशा परिस्थितीत लोकांनीही आपली मर्यादा ओलांडू नये. शक्य तितक्या लवकर साराने सुरक्षतेची व्यवस्था केली पाहिजे.’

काही दिवसांपूर्वी सारा अली खानबद्दल बोलताना रोहित शेट्टीने सांगितले की, ‘सारा खूप सामान्य मुलगी आहे. ‘सिंबा’ मध्ये काम करण्यासाठी साराने मला बर्‍याच वेळा मेसेज केला. एके दिवशी जेव्हा मी तिला भेटण्यासाठी बोलावले तेव्हा ती एकटी आली होती. मला असे वाटत होते की, ती सैफ-अमृताची मुलगी आहे मग ती खूप रुबाबाने येईल आणि बॉडीगार्ड्स तिच्या मागे-पुढे फिरत असतील. पण ती एकटी आली आणि हात जोडून कामाची गरज आहे असे म्हणू लागली.’

साराबद्दल बोलायचे म्हणले तर ती नुकतीच मालदीवमधून सुट्ट्या एन्जॉय करुन परतली आहे. सध्या ती ‘कुली नंबर 1’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट 1995 चा ‘कुली नंबर 1’ चित्रपटाचा रिमेक आहे. या व्यतिरिक्त ती इम्तियाज अली यांच्या ‘लव आज कल’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/