सुशांतच्या भावानं आत्महत्येबाबत केले सूचक विधान, म्हणाला – ‘आम्हाला वाटतं की अभिनेत्यावर बॉलिवूडकडून काहीतरी दबाव होता’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून सोशल मीडियावर एक वेगळी चर्चा सुरू आहे. लोक त्यांच्या आत्महत्येचा कारणांचा अंदाज लावत आहेत. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतचा भाऊ नीरज कुमार बबलू याने म्हंटले की, अभिनेत्यावर बॉलिवूडकडून काही दबाव होता, असे त्यांच्या कुटुंबाला वाटत आहे. सुशांतचा भाऊ नीरजचे हे विधान चित्रपट निर्माता संदीप सिंहच्या विधानानंतर आले.

याआधी चित्रपट निर्माता संदीप सिंहने दावा केला होता कि, सुशांतचे निर्माता करण जोहर, एकता कपूर यांच्याशी चांगले संबंध होते आणि म्हटले कि तो कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नव्हता. तसेच तो कोणत्याही नेपोटिज्मचा बळीही नव्हता. वृत्तसंस्था एएनआय च्या मते, त्याचा भाऊ म्हणतो, ‘आम्ही अद्याप सुशांतच्या धार्मिक प्रथा पूर्ण करत आहोत. या प्रकरणाचा विचार केला तर इंडस्ट्रीत बड्या दिग्गज सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी सुशांतसोबत बॉलीवूडमधील व्यवहारांविषयी बोलले आहे.

नीरज कुमार म्हणाले, ‘म्हणून आम्हाला नक्कीच वाटते की, बॉलिवूडमधून त्यांच्यावर थोडा दबाव होता, नाहीतर या बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुशांतला साथ दिली नसती, म्हणून याची चौकशी झाली पाहिजे.’ त्याच्या भावाने असेही म्हटले आहे की आम्ही तपासणीच्या निकालाची वाट पाहत आहोत आणि थांबलो आहोत. त्याचवेळी नीरजने संदीप सिंहच्या विधानावर त्याने म्हंटले कि, संदीप सिंह सुशांतचा मित्र असू शकतो. त्यांनी माध्यमांशी आपले वयक्तिक म्हणणे मांडले, पण चौकशी होईपर्यंत आपण त्याच्याबरोबर जायला हवे. ‘

सुशांतचा भाऊ नीरज सध्या पोलिस तपासावर विश्वास करत आहे आणि पोलिस अहवालाची वाट पाहत आहे. त्याच वेळी तो म्हणाला की, ‘आम्ही एक कुटुंब म्हणून यामध्ये हस्तक्षेप करीत नाही, एकदा सर्व बाबी उघडकीस आल्यानंतर काय करावे हे पहिले जाईल.’ अभिनेता लोकांसाठी प्रेरणास्थान असल्याचे त्याने यावेळी म्हंटले.