सुशांत सिंह राजपूत सुसाईड केस : चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचली ‘दिल बेचारा’मधील अ‍ॅक्ट्रेस संजना संघी ! (व्हिडीओ)

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात एकूण 27 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी हिची चौकशी केली आहे.

संजनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती कारमधून उतरून पोलीस ठाण्यात जाताना दिसत आहे. तिनं चेहऱ्याला मास्क लावला होता. तिचा चेहरा जास्त स्पष्ट दिसला नाही.

सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा हा सिनेमा 24 जुलै 2020 रोजी डिन्जी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. साऱ्यांनाच सिनेमाची आतुरता आहे. नुकतंच सिनेमाचं प्रमोशन करत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं यावर भाष्य केलं होतं. इतरही कलाकार सिनेमाचं प्रमोशन करत हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्याना आवाहन करत आहेत. या सिनेमाचं डायेरक्शन मुकेश छाबडानं केलं आहे.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर आता सोशलवर इनसाईडर्स-आउटसईडर्स, नेपोटीजम, बॉलिवूडमधील पॉलिटीक्स अशी अनेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे आणि वादही होत आहेत.