पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनं केलं PM नरेंद्र मोदींचं ‘कौतूक’ !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेत ऐतिहासिक मंजुरी मिळाली. विरोधी पक्षाच्या जोरदार विरोधातही संख्याबळाच्या जोरावर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या यशानंतर अनेकजण मोदी सरकारचे अभिनंदन करत आहे. तसेच पाठींबा देत आहे. आता पाकिस्तानी अभिनेत्री विना मलिकने सुद्धा मोदी सरकारच्या समर्थनार्थ मत व्यक्त केले आहे. भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यानंतर विमा मलिकने सोशलमिडीयावरून भारताविरुद्ध गरळ ओकली होती.

विना मलिक मोदी सरकारला सपोर्ट करत नाही. परंतु मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर केल्यानंतर विना मलिकने सरकारला पाठींबा दिला आहे. वीणा मलिकने म्हटले की, पाकिस्तानबरोबर अरब देशांत देखील तिहेरी तलाकची प्रथा सुरु नाही. फक्त भारतातच तिहेरी तलाकची प्रथा सुरु आहे, या प्रथेने भारतीय मुस्लिम महिलांचे खूप शोषण केले आहे पण आता मी खुश आहे कारण भारतात महिलांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे.

मुस्लिम महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोदी सरकार खूप चांगले काम करत आहे. मोदी सरकारला विरोध करणारा विरोधी पक्ष मुस्लिम महिलांच्या सुधारणेविरुद्ध होता. यामुळेच मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत असलेल्या कटू संबंधांशिवाय देखील मोदी सरकारच्या प्रयत्नांना सलाम करते. असे मत अभिनेत्री वीणा मलिकने व्यक्त केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त