Bombay High Court | ‘पीटा’ अंतर्गत कारवाई केल्यास हॉटेल सील करण्याचे आदेश देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांना नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरिक्षण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा अर्थात पीटा (PETA Act) नुसार कारवाई केल्यानंतर पोलिसांना (Pune Police) हॉटेल सील (Hotel Seal) करण्याचा अधिकार नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई हाय कोर्टाने (Bombay High Court) नोंदवले आहे. तसेच हॉटेल मालकाला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचे निरिक्षण हाय कोर्टाने एका प्रकरणात नोंदवले. त्यामुळे हॉटेल सील करण्याचे आदेश रद्द करुन हॉटेल मालकाला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन पुन्हा कार्यवाही करावी असे आदेश कोर्टाने (Bombay High Court) दिले आहेत.

 

मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) न्यायाधीश भारती डांगरे (Judge Bharti Dangre) यांनी हे आदेश दिले आहेत. यासंदर्भात हवेली तालुक्यातील ‘अभिषेक हॉटेल आणि लॉज’ चे मालक शिरिष काळे (Shirish Kale) यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी काळे यांच्या हॉटेलवर छापा टाकून त्याठिकाणी वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरु असल्याचा दावा करत काळे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

 

काळे यांच्या गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक (Arrest) केली. तसेच पीटा कायद्याच्या कलम 18 नुसार हॉटेल सील का करु नये,
अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर आपले म्हणणे दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता.
परंतु पोलिसांकडून मुदतवाढ दिली की नाही याची माहिती काळे यांना मिळाली नाही.
ज्यावेळी पोलीस कारवाई करण्यासाठी आले त्यावेळी हॉटेल सील करण्याचा आदेश असल्याचे काळे यांना समजले,
असे काळे यांनी याचिकेत नमूद केले आहे.

 

हॉटेल सील करण्याचे आदेश रद्द करावेत. तसेच या प्रकरणात म्हणणे मांडण्याची संधी मिळावी
अशी मागणी करणारी रीट याचीका काळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने, पीटा कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर पोलीस आयुक्तांना हॉटेल सील करण्याचा
आदेश देण्याचा अधिकार नाही. तसेच लॉज सील करावे, अशी तरदतूद पीटा कायद्यात नाही.
त्यामुळे ही कारवाई पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

 

 

Advt.

Web Title :- Bombay High Court | the police have no right to seal the hotel if they act according to peta important observations of hc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 1 लाखाची लाच घेणारा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Sudhir Mungantiwar | ‘अजित पवारांच्या कार्यकाळात मंत्रालयात हजारो दारूच्या  बाटल्या…’, सुधीर मुनगंटीवार यांचा खळबळजनक आरोप