विजेचा शॉक लागून तरुण जागीच ठार

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड तालुक्यातील मुक्याच्या कलबाड येथील मयुर चौधरी (१७) याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की मयुर हा घरची बोअरवेल सुरू करण्यासाठी गेला असता तो बराच वेळ घरी न आल्याने त्याला पहावयास गेले असता तो विजेच्या बोर्डाला चिटकलेला दिसला. त्याच वेळेस वीज कर्मचारी गावात आले असता त्यांनी वीज पुरवठा खंडीत केल्यावर त्याची सुटका झाली. त्याला उपचारासाठी तुळई प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथून त्याला मुरबाड येथील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आणले असता त्याला मृत घोषीत केले.  या घटनेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like