#BoycottTakht : लेखकाच्या वादग्रस्त ट्विटमुळं करण जोहरचा ‘तख्त’ वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करण जोहरचा तख्त सिनेमा थिएटरमध्ये येण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमाला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. तख्त सिनेमाचा रायटल हुसैन हैदरी यानं एक ट्विट केल्यानंतर आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अलीकडेच त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. यानंतर लोकांचा राग सातव्या आसमानावर गेला आहे. आपल्या ट्विटमध्ये हुसैननं हिंदूविरोधात वक्तव्य केलं आहे. हुसैननं हिंदू आतंकवादाचा उल्लेख केल्यानं लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

हुसैन हैदरीमुळं आात करण जोहरचा तख्त सिनेमा लोकांच्या निशाण्यावर आला आहे. अनेकांनी करणला खूप सुनावलं आहे. अनेकांनी हुसैनला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/vivekagnihotri/status/1231803996492271618

जर हुसैन हैदरीला तख्तच्या बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर तर आम्ही तख्त पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणार नाही अशी धमकीही लोक देताना दिसत आहेत. काल रात्रीपासून सोशल मीडियावर #BoycottTakht ट्रेंड करताना दिसत आहे.

हुसैन हैदरीवर टीका करताना एकानं म्हटलं आहे की, तू सिनेमासाठी अशा प्रकारचं लिहित आहेस. तुला लाज वाटायला हवी. आणखी एकानं म्हटलं की, ज्या सिनेमासाठी तू हे सगळं करत आहे तो पुढे जाऊन सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरणार आहे. काहींनी तर करणला देखील हिंदू विरोधी असल्याचं म्हटलं आहे. लोकांनी स्पष्ट सांगितलं आहे की, त्यांना हुसैन हैदरीचं ट्विट अजिबात आवडलेलं नाही.

https://twitter.com/bipin_gohil/status/1232163030303203328