‘पुणे तिथे काय उणे’ ! FC मध्ये रंगला मुलांचा ‘साडी डे’ आणि मुलींचा ‘टाय डे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॉलेजमध्ये विविध प्रकारचे डेज साजरे केले जातात ज्यामध्ये साडी डे – टाय डे तसेच ट्रॅडिशनल डे या प्रत्येक दिवशी विद्यार्थी ठरल्याप्रमाने वेशभूषा परिधान करून येतात. मात्र पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात काहीस वेगळं चित्र पहायला मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी डेजच्या दिवशी वेशभूषा बदलायची ठरवली. मुलांनी साडी आणि मुलींनी टाय सूट असा पेहराव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फर्ग्युसनच्या आकाश पवार, सुमित होनवडकर आणि ऋषीकेश सानप या तीन विद्यार्थ्यांनी साडी फक्त मुलींनी नेसायची असा काही नियम नाही, असं म्हणत साडी परिधान केली. या विषयी बोलताना या विद्यार्थ्यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली. स्त्री समजून घ्यायची असेल, स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात आणायची तर ही छोटी कृती आवश्यक आहे, असं या तरुणांचे म्हणणं आहे.

2 वर्षांपूर्वी मेळघाटात एका शिबिरात दिशा पिंकी शेख यांनी तरुणांना स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारता, मग साडी नेसून दाखवाल का, असा सवाल विचारला. फर्ग्युसन कॉलेजच्या सचिन या युवकाने हे आव्हान स्वीकारलं. मात्र 2 वर्षापूर्वी कॉलेजात मुलांनी साडी नेसली म्हणून त्यांना टोमणे मारले गेले. मात्र हार न मानता यंदा या तीन विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा साडी नेसायची ठरवली. फर्ग्युसन कॉलेजला गोपाळ गणेश आगरकर यांच्या आधुनिक विचारांचा वारसा आहे. या तरुणाईने त्याच वारशाची आठवण ठेवत जुन्या प्रथा परंपरा मोडत एक धाडसी पाऊल टाकत कृती केली आहे.

यावेळी कॉलेजातील तरुणींनी देखील या बदलाचा स्वीकार करत श्रध्दा देशपांडेने विद्यार्थ्यांना साडी नेसायला मदत केलीच शिवाय स्वतः सूट टाय घालून मुलांनीच सूट बूट टाय परिधान करायला सांगितले आणि नेहमीची प्रथा मोडून काढली. त्यातच LGBT समुदायातील दिपांकर उषा बॅनर्जीने ट्रान्सजेंडर ओळख न लपवता पेहराव करत वेगळा आयाम या ट्रॅडिशनल डेला दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/