BP Control Tips | हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करायचे असेल तर जाणून घ्या 6 प्रभावी उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – BP Control Tips | उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा सायलेंट किलर असून तो खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे होतो. कमी वयाच्या लोकांना सुद्धा होणार्‍या या आजारात रक्ताच्या धमन्यांच्या (Blood Vessels) भिंतींवर अधिक दबाव पडतो. दबाव वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह (Blood Flow) सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला नेहमीपेक्षा जास्त काम करावे (BP Control Tips) लागते.

 

रक्तदाब वाढला की रुग्णाला डोकेदुखी, छातीत दुखणे, धाप लागणे, त्वचेवर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात. उच्च रक्तदाब नियंत्रणात (BP Control Tips) ठेवण्यासाठी केवळ औषधोपचाराची गरज नाही तर आहार आणि व्यायामही (Exercise) खूप महत्त्वाचा आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, तुम्ही बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या प्रभावी टिप्सचे अनुसरण करू शकता, ज्यामुळे जुना रक्तदाब प्रभावीपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.

 

1. रिकाम्या पोटी पाणी प्या (Drinking Water On An Empty Stomach) :
जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर सकाळी उठून रिकाम्या पोटी तीन ते चार ग्लास पाणी प्या. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

 

2. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या (Drinking Water One Hour After Meal) :
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, जेवल्यानंतर एक तासानंतर पाण्याचे सेवन करणे सर्वात महत्वाचे आहे. दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात (Blood Pressure Control) राहतो, तसेच आजारांपासून बचाव होतो.

3. दुधी भोपळ्याचा ज्यूस प्या (Drink Bottle Gourd Juice) :
दुधी भोपळ्याचा ज्यूस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. दुधी भोपळ्यात (Bottle Gourd ) कोलेस्टेरॉलचे प्रमाण (Cholesterol Level) खूप कमी असते आणि फायबर (Fiber), अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-Oxidants) आणि व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) भरपूर प्रमाणात असते. दुधी भोपळ्यात पोटॅशियमचे (Potassium) प्रमाण जास्त असते, जे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

 

4. मीठाचे सेवन कमी करा (Reduce Salt Intake) :
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मीठाचे सेवन कमी करा. मिठाचे सेवन कमी केल्यास रक्तदाब सामान्य राहील. आपण दररोज आपल्या आहारात 2,300 मिलीग्रॅम म्हणजेच दोन चमचे मीठ (Salt) वापरतो, तर रक्तदाबाच्या रुग्णांनी फक्त 1,500 मिलीग्रॅमपर्यंत मीठ खावे.

 

5. योग करा (Do Yoga) :
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी योगासने करा. योगामध्ये कपालभाती, अनुलोम-विलोम आसने करा, जुन्या रक्तदाबापासूनही सुटका मिळेल.

 

6. मणक्याला बर्फ लावा (Put An Ice Pack On Your Back) :
बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही पाठीचा कणा बर्फाने शेकवा.
शेकण्यासाठी सुती कापडात बर्फ घ्या आणि हळूहळू पाठीचा कणा शेका.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- BP Control Tips | baba ramdevs remedies to control blood pressure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तुम्ही PhonePe वर पेमेंट स्वीकारता तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी; पुण्यात तिघा सराफांची फसवणूक

 

Turmeric For Sugar Control | शुगर कंट्रोल करतो हळदीचा चहा, जाणून घ्या कसा करावा वापर

 

Cinnamon and Honey Benefits | मध आणि दालचीनीचे मिश्रण आरोग्यासाठी अतिशय लाभदायक; जाणून घ्या