Brahmastra Movie | अखेर 5 वर्षानंतर संपली ‘ब्रम्हास्त्र’ची शूटिंग, व्हिडिओमध्ये व्हायरल झाला आलिया – रणबीरचा रोमान्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम | बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra Movie) या चित्रपटाची रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अनेक नेटकरी त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी (Director Of Brahmastra) यांनी दिग्दर्शित केला असून, अखेर या चित्रपटाचं (Brahmastra Movie) चित्रीकरण पूर्ण झाला आहे.

 

 

आगामी चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले असून, दिग्दर्शक अयाननं (Ayan Mukherji) वाराणसीमध्ये तीन दिवसाच्या नंतर चित्रपट शूटिंग संपले असल्याची घोषणा केली आहे. तर या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बल 5 वर्ष लागले. त्यामुळे लवकरच या चित्रपटामध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.

 

 

अभिनेत्री आलिया भट्टनं या चित्रपटाच्या (Upcoming Movie – Brahmastra) शूटिंग नंतर सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती रणबीर कपूर सोबत दिसत असून, व्हिडिओमधील त्या दोघांचा अंदाज अगदीच रोमँटिक (Alia Bhatt – Ranbir Kapoor Romance) दिसत आहे. तसेच व्हिडिओखाली तिनं लिहिलं की (Alia Bhatt Instagram Caption), ‘आम्ही 2018 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुरुवात केली होती. आणि आता… अखेर… ब्रह्मास्त्राचा (एक भाग) पूर्ण झाला आहे. मी सांगू इच्छिते की, एवढा लांबचा वेळ.. हा एक रैप आहे!!!.’

 

दरम्यान, हा चित्रपट (Brahmastra Movie) 9 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असून, चाहते चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक झाले आहेत.

 

 

web title : Brahmastra Movie | ayan mukerji announces alia bhatt ranbir kapoor film brahmastra shooting wrap actress shares beautiful photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा