ब्रह्मोस मिसाईल माहिती प्रकरण : निशांतचा संबंध संघाशी जोडणाऱ्याविरुद्ध तक्रार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला ब्रह्मोस मिसाईलची संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैज्ञानिक निशांत अग्रवाल याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडण्यात येत असून तसे संदेश फेसबुकवर फिरत आहेत. त्याविरुद्ध स्वयंसेवक सागर कोतवालीवाले व अन्य पंधरा जणांनी बालरतन फुले यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0af84bc3-cdd6-11e8-aba9-a72ce2809e29′]

डीआरडीओच्या नागपुरातील ब्रह्मोस एअरोस्पेस या कंपनीत वरिष्ठ सिस्टीम अधिकारी असलेल्या निशांतने ब्रह्मोस मिसाईलचे कोडिंग व इतर अतिसंवेदनशील दस्तावेज घरी आणून स्वत:च्या लॅपटॉपमध्ये ठेवले होते. दरम्यान, आयएसआयने हनी टड्ढॅपद्वारा फेसबुकवरून नेहा शर्मा व पूजा रंजन या बनावट नावांनी निशांतला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली व चॅटिंगच्या माध्यमातून जवळीक साधली. त्यानंतर त्याच्याकडून संरक्षण क्षेत्रातील सुपरसोनिक कंपनीविषयी संवेदनशील माहिती मिळवून घेतली. या प्रकरणात लखनौ दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर एटीएसच्या मदतीने त्याच्या घरावर छापा टाकून  त्याला अटक करण्यात आली. हा निशांत संघाचा प्रतिनिधी आहे, अशी  पोस्ट बालरतन फुले यांनी  फेसबुकवर टाकली. ती पोस्ट सर्वत्र फिरत असून निशांतचा संघाशी काहीएक संबंध नाही. मात्र, फुले याच्या पोस्टमुळे संघाची बदनामी होत असल्याची तक्रार संघ स्वयंसेवक सागर कोतवालीवाले व इतर पंधरा जणांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. यासंदर्भात कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  तक्रारीवर चौकशी सुरू आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल. दरम्यान, गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना शुक्रवारी निवेदन देण्यात येईल, असे कोतवालीवाले यांनी  सांगितले.

[amazon_link asins=’B0711F318V’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2701e0eb-cdd6-11e8-9659-05f0b8259bac’]

दरम्यान, चौकशीत निशांतने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, याप्रकारची अतिसंवेदनशील माहिती ब्रह्मोस एअरोस्पेसच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक इलेक्टड्ढॉनिक उपकरणांवरसुद्धा उपलब्ध आहे. अशा दहा अधिकाऱ्यांची नावे निशांतने एटीएसला सांगितल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यानंतर हे दहा अधिकारीसुद्धा रडारवर आल्याचे सांगितले जात आहे.

मोहन भागवत यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा