मोठी बातमी : अरबाज खान, सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वान यांच्याविरुद्ध BMC नं नोंदवला FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बृहनमुंबई महानगरपालिकेन सुपरस्टार सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान, अरबाज खान, निर्वाण खान यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वाण खान आणि भाऊ अरबाज खान हे सर्व 25 डिसेंबर रोजी युएईहून मुंबईत आला होता. हॉटेल ताज लँड्स एन्ड बुक असल्याचे सांगितले गेल्यानंतर हे तिघेही विमानाबाहेर आले. मात्र हॉटेलमध्ये क्वारंटाईन न राहता ते थेट घरी गेले. यामुळे पालिकेच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी या तिघांवर कारवाई करण्यात येणार आहे.

सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वाण खान आणि भाऊ अरबाज खान हे तिघे क्वारंटाईन न होता थेट घरी गेल्याची माहिती पालिकेच्या एच पश्चिम विभागाला समजली. त्यांनीच खान बंधूंविरोधात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 अनुसार गुन्हा नोंदवला आहे.