Pune : कोरोनाच्या संकट काळात देखील लाचखोरी जोमात; पोलिस अव्वल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट असतानाही लाचखोरीच्या प्रमाण काही कमी झाले नाही. उलट ते अधिकच होतअसून गेल्या दोन महिन्यात तक्रारींमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात २१ कारवाई झाल्या असून त्यापैकी ८ कारवाई पुणे Pune शहरातील आहेत.

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा आता घरच्या घरी, जाणून घ्या

या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचे संकट अधिक गडद होऊ लागले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पुणे Pune शहर व जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. पण तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाच लुचपत विभागाने अधिक कारवाई केल्या आहेत. यामुळे पुन्हा सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांना कोरोना संकट वगैरे काहीचे देणे घेणे नाही असेच पाहायला मिळत आहे. पुणे Pune जिल्ह्यात गेल्या वर्षी २३ मेपर्यंत २० कारवाया झाल्या होत्या. यावर्षी २१ कारवाई झाल्या. त्यापैकी ८ कारवाया पुणे शहरात झाल्या आहेत. आरोग्य विभागही नाही मागे.

बहुसंख्य डॉक्टर, परिचारिका जीवाची पर्वा न करता कोरोनाचा सामना करत आहेत. मात्र काही जण कुठे काही मिळते का ते पाहत आहे. जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालाला फॉर्मच्या छपाईचे बिल काढण्यासाठी २० हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. जनआरोग्य योजनेनुसार मोफत उपचार असतानाही पवना हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून १० हजाराची लाच घेताना डॉक्टराला पकडण्यात आले. तसेच दौंडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला कामगारांची अँटी जन चाचणी केली असताना त्याचे रिपोर्ट देण्यासाठी लाच घेताना पकडण्यात आले आहे. कोरोना काळात पोलीस खात्यात सहा, महसूल विभागात तीन, आरोग्य विभागात तीन, महावितरण विभागात दोन तर आरटीओ, विधी व न्याय, भूमापन, सहकारी संस्था, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेखा, पाटबंधारे विभागात प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली आहे.

Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

पुणे जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वर्ष सापळा कारवाई आरोपी
२०१८ २०० –

२०१९ १८४ २५८

२०२० १३९ १९५

२०२१ २१ ३०

(२३ मे अखेर)

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या