‘लाचखोर’ भाजप नगरसेविकेला न्यायालयाचा ‘दणका’, 5 वर्षांचा कारावास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली यांना लाच प्रकरणी शिक्षा ठोठावली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका असलेल्या वर्षा भानुशाली यांना लाच प्रकरणी ठाणे न्यायालयाने 5 वर्ष कैद आणि 5 लाखांचा दंड ठोठावला आहे.

भाजप नगरसेविका असलेल्या वर्षा भानुशाली यांना 5 वर्षांचा कारावास आणि 5 लाखाचा दंड ठोठवण्यात आला आहे. हा दंड न भरल्यास त्यांना आणखी 6 महिन्याचा कारावास भोगावा लागेल.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 जून 2014 साली सापळा रचून वर्षा भानुशाली यांना त्यांच्या जानकी हेरिटेज इमारतीतील राहत्या घरात लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. एका गाळ्याची बेकायदेशीर उंची वाढविण्यासाठी वर्षा भानुशाली यांनी 1 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. वर्षा यांना 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना रंगेहाथ पकडले होते.

2007 साली महापालिकेच्या निवडणूकीत वर्षा भानुशाली आणि नरेंद्र मेहता हे एकत्र पॅनलमधून अपक्ष निवडून आले होते.

Visit : policenama.com