हैवान ! चुकून तुरुंगातून सुटला ‘रेपिस्ट’, 14 दिवसात केले 11 ‘बलात्कार’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – ब्रिटनमध्ये एका आरोपीला सर्वात मोठा धोकादायक रेपिस्ट म्हणले गेले आहे. या गुन्हेगाराने 2 आठवड्यात 11 बलात्कार केले. अपहरण केले. शारीरिक शोषण केले. त्याचे नाव आहे जोसेफ मॅक्केन. त्यामुळे ब्रिटनच्या सरकारने त्याला सर्वात धोकादायक रेपिस्ट म्हणले आहे.

11 वर्षांपासून 71 वर्षांच्या महिलांवर केला आहे बलात्कार –
34 वर्षाचा हा गुन्हेगार एक सराईत चोर आहे, परंतू एकदा तो तुरुंगातून बाहेर आला. यानंतर त्याने एप्रिलमध्ये 11 बलात्कार केले. पीडित महिलांमध्ये 11 वर्षांपासून 71 वर्षापर्यंतच्या माहिलांचा समावेश आहे.
न्यायालयाने या गुन्हेगाराला 33 वेळा आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. जोसेफवर 37 बलात्कार, शारीरिक शोषण, अपहरण केल्याचा आरोप आहे. न्यायालयात न्यायाधीशांनी सांगितले की जोसेफने कितीही चांगले वर्तन तुरुंगात केले तरी त्याला कमीत कमी 30 वर्षांपर्यंत तुरुंगात राहावे लागेल.

पोलिसांनी चूकून सोडले होते जोसेफला –
पोलीस प्रमुख इंस्पेक्टर कॅथरीन गुडविन यांनी सांगितले की पोलीस विभागाकडून या वर्षी फेब्रवारीमध्ये चूकून जोसेफला पेरोलवर सोडले होते. तेव्हा तो चोरीच्या गुन्हात तुरुंगात तीन वर्ष शिक्षा भोगत होता. परंतू तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांने अनेक बलात्कार केले.

ब्रिटनमध्ये तीन मुलींवर हल्ला –
पोलिसांना तपासात समजले की जोसेफने ब्रिटनच्या वॅटफोर्ड, लंडन आणि नॉर्थवेस्टमध्ये मुली आणि महिलांना लैंगिक शिकार बनवले आहे.न्यायालयात जोसेफला मानसिक रुपात रुग्ण आणि हिंसक रेपिस्ट सांगितले.

पोलीस जेव्हा त्याला पकडण्यासाठी केले तेव्हा तो पळाला आणि झाडावर जाऊन बसला, त्यानंतर पोलिसांनी त्याला झाडावरुन उतरवून ताब्यात घेतले. यानंतर जोसेफ मॅक्केनला न्यायालयात उभे करण्यात आले.

केव्हा केव्हा केला बलात्कार –
21 एप्रिल 2019 ला वॅटफोर्डमध्ये रात्री 3.30 वाजता 20 वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन कारमध्ये तिच्यावर बलात्कार केले. 25 एप्रिलला चिंगफोर्डमध्ये रात्री 12.20 वाजता 20-22 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन त्यावर कारमध्ये बलात्कार केला. 25 एप्रिलला एडवेयरमध्ये दुपारी 12.15 च्या सुमार 20-22 वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

5 मेला सकाळी 8 वाजता 30 वर्षांच्या महिलेवर, एक तरुणीवर आणि 11 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर हॅसिलडेन आणि लंकाशायरमध्ये बलात्कार केला. 5 मेला दुपारी 1.30 वाजता बरी भागात 71 वर्षीय महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. 5 मेला दुपारी 3.30 वाजता मॅचेस्टर भागात हेवुडमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. 5 मेला संध्याकाळी 6.30 वाजता चेशायरमध्ये कांग्लोटेनमध्ये दोन तरुण मुलींवर जबरदस्ती करत त्यांच्यावर कारमध्ये बलात्कार केला.

Visit : Policenama.com