ब्रिटन मधील बर्मिंघममध्ये ‘विचित्र’ चाकूहल्ला !

पोलिसनामा ऑनलाइन – ब्रिटनमधील बर्मिंघममध्ये एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. येथे चाकूने झालेल्या हल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत. या घटनेला रविवारी ब्रिटीश पोलिसांनी या घटनेला “मोठी घटना” असं म्हटलं होते. वेस्ट मिडलँड पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक वेळेनुसार रात्री 12:30 च्या सुमारास बर्मिंघममध्ये चाकू हल्ला झाल्याचे आम्हाला माहिती प्राप्त झाली.’ पोलिसांच्या निवेदनात म्हटलं आहे की यानंतर लवकरच अशाच इतर घटनाही या भागात घडल्या आहेत. या घटनेला एक मोठी घटना घोषित करण्यात आली आहे.

वेस्ट मिडलँड पोलिसांनी सांगितले की, “आमच्या माहितीनुसार बरेच लोक जखमी झाले आहेत, परंतु किती लोक जखमी झाले आहेत आणि त्यांची स्थिती काय आहे हे आम्हाला अद्याप माहिती नाही. सर्व आपत्कालीन सेवा एकत्र काम करत आहेत आणि जखमींना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी कार्य करीत आहे. ”

यूके टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित झालेल्या फुटेजमध्ये दिसत आहे की, शहरातील बरेच भाग खाली करण्यात आली आहेत. तसंच या भागात नाकाबंदीही केली आहे. सर्व पोलिस फॉरेन्सिक सूट परिधान करुन काम करताना दिसत आहेत. वेस्ट मिडलँड पोलिसांनी सांगितले की, “खरोखर या भागात नेमकं काय घडलं आहे हे शोधण्यासाठी काम चालू आहे त्यासाठी थोडा वेळ लागेल. सुरुवातीच्या टप्प्यावर अपघाताचे कारण सांगणे योग्य नाही.”