ब्रिटिश PM Boris Johnson यांनी गुपचुप आपली वागदत्त वधु Carrie Symonds सोबत केला विवाह, वयाने 23 वर्षांनी लहान

लंडन : पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी आल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बेारिस जॉन्सन (PM Boris Johnson) यांच्याबाबत मोठी बातमी आली आहे. जॉन्सन (PM Boris Johnson) यांनी आपली वागदत्त वधू कॅरी सायमंड्स सोबत एका गुप्त सोहळ्यात विवाह केला आहे. या विवाहासाठी दोन्हीकडील कुटुंबिय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

कार्डमध्ये नमूद नव्हते स्थळ
मीडिया रिपोर्टनुसार, जॉन्सन आणि सायमंड्सने अतिशय गोपनीय सोहळ्यात विवाह केला आहे. यापूर्वी ते 30 जुलै 2022 ला विवाह करणार असल्याची चर्चा होती आणि यासाठी 56 वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची 33 वर्षीय वागदत्त वधु कॅरी सायमंड्स यांनी आपले कुटुंबिय आणि मित्रांना विवाहाचे निमंत्रण सुद्धा पाठवले होते. मात्र, कार्डमध्ये विवाहाचे स्थळ नमूद करण्यात आले नव्हते.

दोघांना आहे एक मुलगा
2019 मध्ये जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर जॉन्सन आणि सायमंड्स डाऊनिंग स्ट्रीटमध्ये सोबत राहत आहेत. मागील वर्षी त्यांना एक मुलगा सुद्धा झाला आहे. मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन आहे. यापूर्वी जॉन्सन यांचा विवाह मरीना व्हीलर सोबत झाला होता. या दोघांची 4 मुले आहेत. विवाहाच्या 25 वर्षानंतर सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी घोषणा केली होती की ते वेगळे झाले आहेत. व्हीलर यांच्या अगोदर जॉन्सन यांनी एलेग्रा मोस्टिन-ओवेन सोबत विवाह केला होता. सायमंड्स त्यांची तिसरी पत्नी आहे.

 

Also Read This : 

 

30 मे राशीफळ : आज मकर राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे रविवार

 

वाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळयापासून बनवलेले ‘अ‍ॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या

 

 

LIC ने 8 कंपन्यांमधील आपली पूर्ण भागीदारी विकली ! HDFC Bank सह ‘या’ 5 कंपन्यांमधील सुद्धा कमी केले ‘स्टेक’

 

 

झोपण्यापुर्वी विसरू नका ‘ही’ 6 कामे, त्यानंतरच दिवसभर चेहर्‍यावर राहील चमक, जाणून घ्या

 

शास्त्रज्ञांचा दावा – ‘चीनने लॅबमध्ये बनवला कोरोना व्हायरस, जगाला फसवण्यासाठी केलं होतं ‘रेट्रो’ इंजीनियरिंग’

 

 

चेहर्‍यावरील सुरकूत्यामुळं परेशान आहात की व्हायचंय रोगमुक्त, ‘या’ खास गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या