Brokini : काय सांगता ! होय,आता पुरूषांसाठी बिकिनी, ऑनलाइन विक्री सुरू, जाणून घ्या किंमत

टोरंटो : वृत्तसंस्था –  आत्तापर्यंत तुम्ही फक्त महिलांसाठी असणाऱ्या बिकिनी बद्दल ऐकलं असेल पण आता पुरुषांसाठी देखील बिकिनी आली असून, तिला “ब्रोकिनी” असं नाव देण्यात आलं आहे. पुरुषांसाठी असणारी ही बिकिनी वन शोल्डरची आहे, तिला ब्रोकिनी नाव देण्यात आलं आहे. या बिकिनीची डिझाईन कॅनडा मधील टोरंटो येथील दोन तरुणांनी केली आहे. टोरंटो मध्ये दोन तरुणांनी मिळून पुरुषांसाठी लागणाऱ्या स्वीमवेअरची कंपनी सुरु केली आहे.

https://www.instagram.com/stories/brokinis/?utm_source=ig_embed

पुरुषांसाठीच्या बिचवेअरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही पुरुषांची बिकिनी दिसताना स्टायलिश दिसत आहे पण ही घातल्यानंतर नक्की ‘लाज’ वाटेल. ही सिंगल लोन्ग शोल्डर स्ट्रेप मध्ये तयार करण्यात आली असून बिकिनीच्या खालच्या भागात अंडरवेअरचा आकार देण्यात आला आहे.

https://www.instagram.com/brokinis/?utm_source=ig_embed

ब्रोकिनी सध्या दोन प्रिन्टमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पहिली ब्रोमिंगो (पिंक फ्लेमिंगो पॅटर्न) आणि दुसरी फाइनअप्पल (ब्लू आणि यलो पायनापाल). वेबसाईटवर फोटो उपलब्ध आहेत त्याची किंमत 45 डॉलर इतकी आहे. सास्कोने (मुलाचे नाव) सांगितले की, आम्ही बॅचलर्स पार्टीचा प्लॅन केला त्यामध्ये क्रेजी बाथिंग सूट घालण्याचा विचार केला, त्यानंतर आम्हाला वाटलं की हे एक स्वीमवेअर देखील असू शकतं. त्यानंतर आम्ही यावर अजून विचार केला आणि या ब्रोकिनीची आयडिया सुचली. तो म्हणाला, आम्ही सुरुवातीला 250 सूट बनवले ज्यावर 5,000 डॉलर खर्च केला. पहिली विक्री 19 जुलैला झाली होती.

तो म्हणाला की, आम्ही अशा स्वीमवेअर बद्दल विचार करत होतो जो घालून बीचवर देखील फिरता येईल. तो पुढे म्हणाला ब्रोकिनी कोविड काळातही लोकांना घालण्यासाठी फायदेशीर असेल.