चीनमधून अमेरिकेत पोहचला दुसरा ‘भयानक’ आजार, खारीमधील ब्यूबोनिक प्लेगचा बॅक्टेरिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूशी लढत असताना जगासाठी एक वाईट बातमी आहे. चीननंतर आता अमेरिकेत कोलोरॉडो येथे खारीला ब्युबॉनिक प्लेगची लागण झाल्याचे आढळले आहे. आता अमेरिकन शास्त्रज्ञांना ही भीती वाटत आहे की, चीनमधून कोरोना आल्यावर आता चीनमधील ब्युबॉनिक प्लेग आजार पुन्हा पसरू नये.

१० दिवसांपूर्वी चीनच्या अंतर्गत मंगोलियामध्ये ब्यूबॉनिक प्लेग पसरण्याची बातमी आली होती. ब्यूबॉनिक प्लेगने जगावर तीन वेळा हल्ला केला आहे. पहिल्यांदा यात ५ कोटी लोक, दुसऱ्यांदा युरोपमधील एका तृतीयांश लोकसंख्या आणि तिसऱ्यांदा ८० हजार लोक मारले गेले होते. आता पुन्हा एकदा दहा दिवसांत चीन आणि अमेरिकेतून हा आजार पसरल्याची बातमी समोर आली आहे.

११ जुलै रोजी अमेरिकेतील कोलोरॉडोच्या मॉरिसन शहरात एका खारीला ब्यूबॉनिक प्लेगची लागण झाल्याचे आढळले आहे. कोलोरॉडोमध्ये प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच उंदीर, खार आणि मुंगूस यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

ब्यूबॉनिक प्लेग हा उंदरांमध्ये आढळणार्‍या बॅक्टेरियाने पसरतो. या बॅक्टेरियाचे नाव यर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे. हा जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे बोटं काळी पडून सडू लागतात. नाकाबाबतीतही असेच होते.

ब्युबॉनिक प्लेगला गिल्टीवाला प्लेग देखील म्हटले जाते. यात शरीरात असह्य वेदना, तीव्र ताप येतो. नाडी वेगाने पुढे जाऊ लागते. दोन-तीन दिवसांत गिल्टी बाहेर येऊ लागते. १४ दिवसात या गिल्टी शिजतात. यानंतर शरीरात होणाऱ्या वेदना अंतहीन असतात.

ब्यूबॉनिक प्लेग सर्वप्रथम उंदरांना होतो. उंदीर मेल्यानंतर या प्लेगचे जीवाणू पिसांद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. यानंतर जेव्हा पिसू मनुष्यांना चावतो तेव्हा ते मानवांच्या रक्तात संसर्गजन्य द्रव सोडते. यानंतरच व्यक्तीला संसर्ग होऊ लागतो. उंदीर मेल्यानंतर दोन-तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो.

 

जगभरात ब्यूबॉनिक प्लेगची २०१० ते २०१५ दरम्यान सुमारे ३२४८ प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी ५८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षांत बहुतेक प्रकरणे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, मॅडागास्करमध्ये, पेरूमध्ये आली होती.

यापूर्वी १९७०-८० या काळात हा आजार चीन, भारत, रशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण अमेरिकन देशांमध्ये आढळून आला आहे.

६ व्या आणि ८ व्या शतकात ब्यूबॉनिक प्लेगलाच प्लेग ऑफ जस्टिनियन (Plague Of Justinian) नाव दिले गेले होते. या आजाराने त्यावेळी संपूर्ण जगात सुमारे २.५ ते ५ कोटी लोकांचा जीव घेतला होता.

ब्यूबॉनिक प्लेगचा दुसरा हल्ला जगावर १३४७ मध्ये झाला. तेव्हा याला ब्लॅक डेथ असे नाव दिले गेले होते. त्यावेळी युरोपच्या एक तृतीयांश लोकसंख्येला संपवले होते.

ब्यूबॉनिक प्लेगचा तिसरा हल्ला जगावर १८९४ च्या सुमारास झाला होता. तेव्हा त्यात ८० हजार लोक मारले गेले होते. त्याचा सर्वाधिक परिणाम हाँगकाँगच्या आसपास दिसून आला होता. भारतात १९९४ मध्ये पाच राज्यात ब्युबॉनिक प्लेगची सुमारे ७०० प्रकरणे नोंदली गेली होती. यापैकी ५२ लोकांचा मृत्यू झाला होता.