अमेरिकेतून भारतात आलेली विद्यार्थीनी पडली छेडछाडीचा बळी, मिळाली होती 4 कोटीची शिष्यवृत्ती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला. अभ्यासात हुशार असलेली सुदीक्षा भाटी दोन वर्षांपूर्वी इंटरमिजिएट परीक्षेत बुलंदशहर जिल्ह्यात प्रथम आली होती. त्यानंतर स्कॉलरशिपच्या जोरावर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. मात्र कोरोनामुळे भारतात आलेल्या सुदीक्षाचा काही टवाळखोरांमुळे जीव गमवावा लागला.

सुदीक्षा काकांसमवेत नातेवाईकांकडे स्कूटरवरून जात असताना बुलेटवरून काही मुले त्यांचाा पाठलाग करत होती. रस्त्यात बुलेटसवार मुलांनी सुदीक्षाची छेड काढण्यास सुरुवात केली. आरोपी युवक सतत बाइक ओव्हरटेक करत होती. त्याच दरम्यान या मुलांपासून वाचवण्याच्या नादात सुदीक्षाने अचानक गाडीला ब्रेक लावला. त्यामुळे गाडी घसरल्याचे तिचाा जागीच मृत्यू झाला.

सुदीक्षा 20 ऑगस्टला अमेरिकेत परतणारी होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात ती कोरोनामुळे मायदेशी परतली होती. 2018 मध्ये इंटरमीडिएटमध्ये बुलंदशहर जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले होते. त्यानंतर सुदिक्षाला 3 कोटी 80 लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती दिली, ज्याच्या जोरावर सुदीक्षा अमेरिकेतील बॉबसन कॉलेजमध्ये शिकत होती.