Burglary in Pune | चंदननगर-खराडी आणि फुरसुंगीत भरदिवसा घरफोड्या, 12 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील घरफोड्या (Burglary in Pune) थांबत नसून, चोरट्यांनी दोन ठिकाणी फ्लॅट फोडत 12 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चंदननगर-खराडी (Chandannagar-Kharadi) आणि फुरसुंगी (Fursungi) परिसरात या घरफोडीच्या (Burglary in Pune) घटना घडल्या आहेत. भरदिवसा या घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.

याप्रकरणी चंदननगर पोलिस (Chandannagar Police Station) ठाण्यात 52 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या खराडी बायपास (kharadi bypass) येथील रक्षकनगर सोसायटीत (rakshak society) राहतात. कामानिमित्त त्या घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी कुलूप उचकटून चोरट्यानी घरात प्रवेश केला. तसेच बेडरूमधील लॉकरचे कुलूप तोडून 3 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार १९ जुलैला दुपारी सव्वादोन ते तीन या वेळेत घडला. या इमारतीतीलच अन्य एका फ्लॅटचे कुलूपही अज्ञाचाने तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी केवळ घरगुती सामान ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथून काही चोरी झाल्याचे दिसून आले नाही.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हडपसर (Hadapsar) येथील फुरसुंगीत (Fursungi) सुतार आळीत (दि. 14 ते 17 जुलै) या काळात घरफोडी झाली आहे. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. फिर्यादी हे सकाळी पत्नीला औषधोपचारासाठी फ्लॅटला कुलूप लावून कर्वेनगर येथे गेले होते. त्यानंतर 17 जुलैला रात्री ते घरी परत आले. त्यावेळी त्यांना घरफोडी झाला असल्याचा प्रकार दिसून आला. त्यांच्या बेडरूमच्या खिडकीचे गज वाकडे करून घरात प्रवेश केला. तसेच कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 8 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस (Hadapsar Police) करत आहेत.

Web Title :- Burglary in Pune | Burglary in Chandannagar-Kharadi and Fursungi in afternoon, Rs 12 lakh stolen from flat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही