बीड : बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

बीड (केज) : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ हा भीषण अपघात झाला असून नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले आहे.

औरंगाबाद-मुखेड ही बस आणि कोंबड्या घेऊन जाणारा एक टेम्पोमध्ये चंदनसावरगाव येथे आज दुपारी एकच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रत्यदर्शींनी आणि ग्रामस्थांनी लगेच अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या भीषण अपघातामुळे बसमध्ये रक्ताचा सडा पडलेला आढळून आला. अपघातात बसमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

भीषण अपघातात 15 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना स्थानिकांच्या मतदीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी आणि मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/