TikTok वर सर्वात जास्त ‘फेमस’ कोण ? इथं पाहा Top ची यादी

नवी दिल्ली : भारतात टिकटॉकचे 25 कोटीपेक्षा जास्त यूजर्स आहेत. टिकटॉक अ‍ॅपमध्ये 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवून तुम्ही अपलोड करू शकता. टिकटॉकवर व्हिडिओ बनवणार्‍यांना टिकटॉक क्रिएटर्स म्हणतात. याबातमीत आपण याच्या टॉप क्रिएटर्सबाबत माहिती घेणार आहोत. टिक टॉकवर सर्वात जास्त फेमस कोण आहेत? ते जाणून घेवूयात.

मिस्टर फॅसु
हा एक टिकटॉक सुपरस्टार आणि फॅशन ब्लॉगर आहे. त्याला लोक मिस्टर फॅसुच्या नावाने सुद्धा ओळखतात. टिकटॉकवर त्याचे 23 मिलियन फॉलोअर्स आहेत.

रियाज अली
रियाज अली सुद्धा मोठा टिकटॉक स्टार आहे, ज्याचे 21 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. रियाज अली टिकटॉक अ‍ॅपवर डान्सिंग आणि ह्यूमरसाठी प्रसिद्ध आहे.

ऐवेज दरबार
ऐवेज दरबारचे टिकटॉकवर 20 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो बहिण अनम आणि आपल्या आई फरजाना दरबारसोबत क्यूट व्हिडिओ पोस्ट करत असतो.

गरिमा चौरसिया
गरिमा चौरसिया टिकटॉकचा प्रसिद्ध चेहरा आहे. गरिमा डान्स, स्टाईल आणि बोल्डनेसद्वारे टिक टॉकवर प्रसिद्ध आहे. गरिमाचे टिक टॉकवर 19.9 मिलियन फॉलेओर्स आहेत.

जन्नत जुबैर
टिकटॉकवर जन्नत जुबैर रहमानीचे 19.4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जन्नत जुबैर रहमानी एक भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने 2009 मध्ये आपल्या करियरला सुरूवात केली होती. जन्नतने 2011मध्ये कलर्स टीव्हीच्या फुलवाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली.

मंजुल खट्टर
मंजुल खट्टर मॉडल, सिंगर, यू ट्यूबर आणि टिकटॉक स्टार आहे. मंजुल टिकटॉक अ‍ॅपवर कॉमेडी व्हिडिओ टाकतात. जे खुप पसंत केले जातात. टिकटॉकवर त्यांचे एकुण 12 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like