फायद्याची गोष्ट ! 2 लाख गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, दरमहा कमवा 1 लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे स्वतःची शेतजमीन असेल आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. राखेपासून विटा बनवण्याचा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता. याच विटांना सिमेंटच्या विटा देखील म्हटले जाते. यासाठी तुमच्याकडे जवळपास 2 एकर जमीन आणि कमीतकमी 2 लाख रुपये भांडवल असायला हवे. यामधून तुम्ही महिन्याला जवळपास 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता.

3 हजार विटांचें घ्यावे लागणार उत्पादन
वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे बिल्डर सध्या याच विटांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत. या विटा विजेच्या यंत्रांमधून निघणारी राख, सिमेंट आणि डस्ट पावडरपासून तयार करण्यात येते. मात्र या व्यवसायातील अनेक रक्कम हि, तुम्हाला मशिनरीसाठीच खर्च करावी लागणार आहे. जवळपास 5 ते 6 व्यक्तींची देखील तुम्हाला या व्यवसायामध्ये मदत  लागणार आहे. त्याचबरोबर दररोज जवळपास 3 हजार विटांचे उत्पादन तुम्हाला यामार्फत करावे लागणार आहे.

10 ते 12 लाख रुपये ऑटोमेटिक मशीनचा  खर्च
या व्यवसायात तुम्ही ऑटोमेटिक मशीन वापरल्यास तुमचे उत्पन्न दुपट्ट होण्यास मदत होणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला 10 ते 12 लाख रुपये तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत. याद्वारे तुम्ही तासाला १ हजार विटा तयार करू शकता. तसेच महिन्याला जवळपास 3 ते 4 लाख विटांचे उत्पादन घेऊ शकता.

येथून मिळवा कर्ज
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्ही पंतप्रधान रोजगार योजना तसेच मुख्यमंत्री युवा स्व-रोजगार योजनेमार्फत कर्जासाठी अर्ज करू शकता.

Visit : Policenama.com