फेब्रुवारी 2021 पर्यंत ‘कोरोना’ची केवळ 40 हजार प्रकरणे भारतात शिल्लक राहतील : आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत कोरोना व्हायरसच्या भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या घटून ती केवळ 40 हजारांवर येईल. अनेक बड्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या आधारे ते असे म्हणाले आहेत. आरोग्यमंत्री म्हणाले आहेत की विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगातील अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भविष्यात कोरोना प्रकरणांचे मूल्यांकन मॉडेल तयार केले आहे. वैज्ञानिकांच्या तंत्रज्ञानाच्या आधारे संशोधनातून असे समोर आले आहे की येत्या तीन ते चार महिन्यांत देशात कोरोनाची प्रकरणे कमी होतील. आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत देशात केवळ 40 हजार सक्रिय प्रकरणे उपस्थित राहतील.

प्रकरणांची वाढती संख्या थांबवावी लागेल

आरोग्यमंत्री यांनी लसीबद्दल सांगितले की लसीकरण, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि इतर गोष्टींबद्दल वेळ येईल तेव्हा राज्य सरकारांशी चर्चा केली जाईल. तसेच ते म्हणाले, आमचा विश्वास आहे की आता देशात कोरोनाची प्रकरणे ही वाढणार नाहीत. आपण सातत्याने कमी होत असलेल्या घटनांकडे पाहतच आहोत.

नीती आयोगाच्या सदस्यांनी काय म्हटले?

याआधी, नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी हिवाळ्याच्या हंगामात संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारलेली नाही. तथापि, त्यांचे असेही म्हणणे आहे की बचावाची मार्गदर्शक तत्त्वे अवलंबली गेली तर फेब्रुवारी 2021 पर्यंत देशात कोरोना विषाणू नियंत्रणात येऊ शकतो.

आढावा बैठकीत पंतप्रधानांनीही माहिती घेतली

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस आणि तिच्या वितरण प्रणाली संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे की कोरोनाची लस पुढील वर्षाच्या सुरूवातीस भारतात येणे अपेक्षित आहे.