फायद्याची गोष्ट ! दररोज फक्त 40 रूपये ‘बचत’ करा अन् ‘मिळवा’ 8 लाख रूपये, ‘श्रीमंत’ बनवणारी स्कीम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बर्‍याचदा लोक विचार करतात की कमी पैशांनी श्रीमंत कसे बनता येईल, परंतु तसे नसते. जर आपण दररोज काही पैसे वाचवून म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक केली तर ठराविक वेळेनंतर आपण लक्षाधीश होऊ शकता. अश्याप्रकारे दररोज 40 रुपये बचत करुन तुम्ही 8 लाख रुपयांचा निधी जमवू शकता. जाणून घेऊया या योजनेसंदर्भात,

जर आपण दररोज 40 रुपयांची बचत केली तर ते दरमहा 1,200 रुपये होतील. चांगल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत तुम्हाला एसआयपीमार्फत दरमहा 1,200 रुपये गुंतवावे लागतात. हि गुंतवणूक 15 वर्ष करावी लागते. यात 15 टक्के परतव्यानुसार 15 वर्षानंतर तुमच्याकडे 8 लाख रुपयांचा निधी जमा होईल.

जर आपण 15 वर्षांसाठी म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक केल्यास आपली एकूण गुंतवणूक 2,16,000 रुपये होईल. त्याच वेळी आपल्या एसआयपीचे एकूण मूल्य 8,02,208 रुपये असेल. ज्यात 15% परतावा दिला जाईल. म्हणजेच आपल्याला 5,86,208 रुपयांचा लाभ मिळेल. म्युच्युअल फंडाच्या रिटर्नबद्दल बोलायचे झाल्यास अश्या काही योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 परतावा दिला आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडाला 15 वर्षांत 15.20 टक्के, डीएसपी इक्विटी संधी फंडात 14.67 टक्के, फ्रँकलिन इंडिया प्राइम फंडामध्ये 15.07 टक्के परतावा मिळाला आहे.

हे प्रमाण आहे जे युनिटनुसार म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनावरील येणाऱ्या खर्चाला प्रति युनिट रूपात सांगतो. म्युच्युअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण मिळविण्यासाठी, त्याची एकूण मालमत्ता एकूण खर्चाद्वारे विभागली जाते.

You might also like