एक्सरसाइजआधी कॉफी पिल्याने होतात ‘हे’ फायदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कॉफी प्यायल्याने फ्रेश वाटतं शिवाय ब्लड सक्र्युलेशनला कॅफीन मिळते. शरीराला कॅफीन मिळाल्याने सतर्कता, एकाग्रता वाढते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शारीरिक आणि मानसिक प्रदर्शन सुधारते. एक्सरसाइज करण्याआधी कॉफी प्यायल्याने अधिक वेळ एक्सरसाइज करता येऊ शकते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीरात जादा चरबी कमी होते. एक्सरसाइज करण्याआधी कॉफी प्यायल्याने फॅट सेल्सचा ग्लायकोजन विरोधासाठी एक ऊर्जा स्त्रोत म्हणूण वापर होतो.

एक्सरसाइज केल्यावर सामान्यपणे अनेकांच्या मांसपेशींमध्ये वेदना होतात. एक्सरसाइज करण्यापूर्वी कॉफीचं सेवन केल्याने मांसपेशीमध्ये वेदना कमी होतात. कॉफी विशेष रुपाने एथलीटोंच्या मांसपेशीमध्ये इंधनासारखे काम करते. नियमितपणे कॉफी केल्यास ब्लड सक्र्युलेशन चांगले होते. कारण कॅफीन ऊर्जेत संतुलन राखणाऱ्या एडेनॉलिनची निर्मिती वाढवते. त्यासोबतच मांसपेशी आणि हार्टमध्ये ब्लड सक्र्युलेशनमध्ये सुधारणा होते. कठिण एक्सरसाइज करण्यासाठी एक्स्टा एनर्जी आणि मेंटल फोकसची गरज असते. यामुळे एक्सरसाइज जास्त प्रभावी आणि फायदेशीर होते. ब्लॅक कॉफी प्यायल्याने या दोन्हींची गरज भरुन निघते. तसेच कॉफी पिणाऱ्यांची स्मरणशक्तीही चांगली वाढते. कॉफी पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

कॉफीमध्ये असलेले कॅफेन मेंदूमधील डोपामीनची पातळी वाढवते. त्यामुळे स्मरणशक्ती सारख्या क्षमता वाढतात. यामुळे तुमची एनर्जी लेव्हलही वाढते. ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. कॅफेन शरीरातील मेटाबॉलिकचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होतात. तसेच ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर घटते. ब्लॅक कॉफीमध्ये अ‍ँन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, मिनरल्स असते. अ‍ँन्टीऑक्सिडंट हेल्थशी संबंधित जुन्या समस्या दूर करते. कॅन्सरच्या समस्याही दूर होण्यास मदत होते. ब्लॅक कॉफी मधुमेहाच्या सर्व शक्यता दूर होऊ शकतात. शिवाय हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही मदत होते.