कॅम्प परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱा नायझेरियन गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे कॅम्प परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका नायझेरियन व्यक्तील लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून कोकेन आणि क्रिस्टल मेथ या अंमली पदार्थासह ७८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज (गुरुवार) पहाटे तीन ते पावणे चारच्या दरम्यान  पुणे कॅम्प मधील गुरुद्वारा रोडवरील स्पायशर कॉलेज, गणेश खिंड येथे करण्यात आली.

जॉन्सन (पूर्ण नाव सांगता येत नाही रा. पिंपळे गुरव, मुळ रा. नायझेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणपतराव थिकोळे यांनी फिर्य़ाद दिली आहे.

फिर्यादी हे गणेश खिंड परिसरात गस्त घालत असाताना जॉन्सन हा संशयितरित्या आढळून आला. पथकाने त्याला त्याब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडून प्रत्येकी १ ग्रॅम वजनाच्या ११ कोकेनच्या पुड्या तसेच क्रिस्टल मेथ नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत ४२ हजार ५०० तर क्रिस्टल मेथची किंमत १० हजार रुपये  असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्कुटी पेप, मोबाईल असा एकूण ७८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक व्ही.डी. चव्हाण करीत आहेत.

You might also like