केवळ ‘कोरोना’च नव्हे तर ‘या’ आजारानं देखील घसा सुजतो, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लिंफोनिया कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ही खूप साधी असतात. मानेला सूज आणि वेदना होतात. या साध्य लक्षणांमुळे याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. शरीरातील लिम्फ नोड्समध्ये दिसणारा कॅन्सर हा जीवघेण्या आजाराचे संकेत देतो. पेशी ट्यूमरजवळ लिंफ नोड्समध्ये दिसतात तेव्हा तो पसरण्याची सुरूवात असते. तपासणीदरम्यान कॅन्सरच्या पेशींची वाढ जास्त प्रमाणात झालेली नसल्याचे डॉक्टरच्या निदर्शनास आले तर या जीवघेण्या आजारापासून बचाव होऊ शकतो.

ही आहेत लक्षणे

1 गिळताना त्रास
2 घशात खवखव
3 वजन कमी होणे
4 जबड्यात वेदना
5 थुंकीत रक्त येणे
6 कानामध्ये दुखणे
7 घशात तीव्र वेदना
8 खोकला येणे

हे आहेत 8 उपाय

1  केमोथेरेपीचा वापर करून घशातील कॅन्सरच्या पेशींना नष्ट केले जाते.

2  ऑपरेशन करून घशाच्या कॅन्सरची गाठ काढली जाऊ शकते.

3  विकिरण पद्धतीचा वापर करून गामा किरणांसारख्या किरणांच्या नियंत्रित मात्रांचा वापर करून विशिष्ट भागांमध्ये घशाच्या कॅन्सरच्या पेशीं नष्ट केल्या जातात.