कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या निवडणुका लांबणीवर

 अपयश झाकण्यासाठी भाजपची खेळी- कॉंग्रेस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे, खडकीसह देशभरातील ५५ कॅंटोन्मेन्ट बोर्डांना मुदतवाढ देऊन निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना बुधवारी पाठविली आहे. येत्या १० तारखेला बोर्डचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे लगेचच निवडणुका होतील अशा दृष्टीने इच्छुक तयारीला लागले होते.

सर्वच कॅन्टोन्मेन्ट बोर्डच्या हद्दीत विकास कामात आलेले अपयश झाकण्यासाठी, तसेच पराभवाच्या भितीने भाजप सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस आणि प्रवक्ते रमेश अय्यर यांनी केला आहे. सेवा, वस्तू कराचा वाटा ( जीएसटी ) केंद्र सरकारने पुणे, खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाला दिला नाही, पाच वर्षात भाजपच्या खासदार, आमदारांनी विकासाकडे दुर्लक्ष केले, अशी टीका अय्यर यांनी केली आहे.

पुणे आणि खडकीत लष्कराची संवेदनशील केंद्रे आहेत. सुरक्षेसाठी बोर्ड आवश्यक आहे, पण खासदार गिरीश बापट बोर्डाचे अस्तित्व संपवून महापालिका हद्दीत त्यांचा समावेश करा म्हणत आहेत. बापट यांच्या या भूमिकेला काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे.