Kolhapur : भरधाव इनोव्हा कार बसवर धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव इनोव्हा कारने एसटी बसला जोरदार धडक (car-and-bus-accident) दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापुराजवळ गगडबावडा इथे कळंबे गावाजवळ (kolhapur-gaganbavda-ghat-kalamb-village) हा भीषण अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढच्या बोनेटचा चुराडा झाला आहे.

मृतांची आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत. राज्य परिवहन महामंडळाची बस कणकवलीहून लातूरच्या दिशेने निघाली होती. तर इनोव्हा कारमधून तीघे गावी जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या बसला भरधाव कारची जोरदार धडक बसल्याने कारमधील तीघांचा मृत्यू झाला.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारच्या पुढच्या बोनेचा चुराडा झाला आहे. दरम्यान या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र पोलिसांकडून तपास सुरू आहे.

You might also like