ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मारिनच्या वडिलांचं निधन

पोलीसनामा ऑनलाइन – रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅटमिंटन मधील महिला एकेरी गटातील सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मारिन हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कॅरोलिना हिच्या वडिलांचे रविवारी निधन झालं, अशी माहिती स्पेनच्या बॅडमिंटन असोसिएशनने दिली आहे. गोंझालो मारिन पेरेझ असे त्यांचे नाव असून फेब्रुवारी महिन्यात त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती.

स्पेन बॅडमिंटन असोसिएशननं ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “गोंझालो मारिन पेरेझ यांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. फेब्रुवारी महिन्यात अपघात झाल्यापासून ते मृत्यूशी झुंज देत होते. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुःखाच्या काळात स्पॅनिश बॅडमिंटन असोसिएशन कॅरोलिना मारिनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.” असे त्यांनी म्हटलं आहे.

गोंझालो मारिन पेरेझ हे कामावर असताना पडले आणि त्यावेळेस त्यांना गंभीर दुखापत झाली. तेव्हा मारिन ऑल इंग्लड स्पर्धेत खेळत होती. आणि तिला घरी परतावे लागले. रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.