पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांशी अश्लिल बोलणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पोलीस नियंत्रण कक्षात फोन करुन तेथील महिला पोलिसांशी अश्लिल बोलून त्यांचा विनयभंग करणाऱ्या चौघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटना २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ०९:१२ वाजता आणि १२:३० वाजता आणि २आॅक्टोंबर रोजी सकाळी ९़:१२ वाजता हे फोन आले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80d1a3ec-c6db-11e8-96fe-c1561483b593′]

पोलीस नियंत्रक कक्षातील १०० क्रमांक मोफत आहे. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन त्यावर अनेकदा त्रास देण्याच्या हेतूने लोक फोन करीत होते. दिवसभरात असे काही हजार कॉल येत होते. पोलिसांनी १०० क्रमांकावर जयहिंद ही टेप सुरु केल्यानंतर असे त्रास देण्याच्या हेतूने केल्या जाणाऱ्या फोनमध्ये मोठी घट झाली. लोकांना तातडीची मदत पोहचविण्यासाठी १०० क्रमांक गरजेच्या लोकांना पटकन लागू लागला आहे. त्याबद्दल लोकांनी पोलिसांचे अभिनंदनही केले होते. असे असताना काही जण जाणिवपूर्वक १०० क्रमांकावर फोन देऊन तेथील महिला पोलिसांना त्रास देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

[amazon_link asins=’B009AWWAUM,B00404KCGY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94067a70-c6db-11e8-a95a-fb16ee2a918c’]

पोलीस नियंत्रण कक्षात कॉल आल्यानंतर तो कोणत्या फोनवरुन आला तो क्रमांक तेथे दिसत असल्याने त्याची नोंद घेण्यात येते. हे क्रमांक तपास अधिकाºयांकडे देण्यात आले असून असे अश्लिल बोलून त्रास देणाऱ्या चौघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.