चोरी प्रकरणी भाजप नेत्याविरुद्ध FIR दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – दुसऱ्याचे बांधकाम पाडून तेथील साहित्य चोरी केल्याप्रकरणी नागपूर येथील भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात भाजपचा पदाधिकारी असलेल्या विलास करांगळे आणि त्याच्या दोन साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालाश अंगेश्वर विंचूरकर (वय-25 रा. आयोध्यानगर) यांनी याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पलाश अंगेश्वर विंचूरकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी भाजप पदाधिकारी विलास करांगळे आणि त्याच्या इतर दोन साथीदरांविरुद्ध चोरीसह विविध गुन्हे दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली खुर्द येथे विंचूरकर यांचा भूखंड आहे. विंचूरकर यांनी तेथे बांधकाम केले होते. यानंतर वेळोवेळी करांगळे याने साथीदारांच्या मदतीने तक्रारदार पलाश यांना धमकावले.

करांगळे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी पलाश विंचूरकर यांना हा भूखंड माझा असून तो रिकामा करण्याची धमकी दिली. यानंतर करांगळे याने वारंवार तक्रारदार यांना भूखंड रिकामा करण्यासाठी धमकावले. तसेच भूखंडावर करण्यात आलेले बांधकाम पाडण्याची धमकी दिली. 24 जानेवारीला करांगळे व त्याच्या साथीदारांनी बांधकाम तोडून त्यातील साहित्य चोरून नेले. विंचूरकर याने हुडकेश्वर पोलीसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. करांगळे हा एका माजी आमदाराचा अत्यंत विश्वासू असल्याची माहिती आहे.